Marathi Bhasha Gaurav Din wishes : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास शुभेच्छा!
Marathi Bhasha Gaurav Din 2025 wishesh : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी तथा लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून सोशल मीडियावर आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना तुम्ही मराठमोळ्या शुभेच्छा पाठवा.
मराठी भाषा दिन साजरा करण्यामागील उद्देश काय?
मराठी भाषा गौरव दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आहे. तरुण लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यास प्रेरित करणे हे देखील या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

विविध कार्यक्रमांचे केले जाते आयोजन?
या दिवशी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाळा, महाविद्यालये आणि साहित्यिक संस्था मराठी साहित्य, संस्कृती आणि इतिहासावर प्रकाश टाकणारे विशेष कार्यक्रम आयोजित करतात. मराठीतील कविता वाचन, कथाकथन सत्रे आणि भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांना आणि उत्साही लोकांना त्यांचे भाषिक आणि सर्जनशील कौशल्य प्रदर्शित करण्यास प्रोत्साहित करतात.

खालील खास संदेश पाठवा, तुमच्या स्नेहीजणांना, मित्र परिवाराला अन् साजरा करा मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह...!
- लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
- लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी! - मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा आपल्या अस्तित्वाची ओळख, गौरव दिनाच्या शुभेच्छा!
मराठी वाचा, लिहा, आणि अभिमानाने बोला, गौरव दिनाच्या शुभेच्छा!
- मराठी बोलुया, मराठी वाचुया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
- मराठी शब्दांच्या ओळीचा दिवस, गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी संस्कृती ला सजरा करूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
मराठी भाषाशिवाय जीवन असम्भव, गौरव दिनाच्या शुभेच्छा!
- मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा
- मराठी अस्मिता आणि संस्कृती ला वंदन, गौरव दिनाच्या शुभेच्छा!
- अभिमानाने मराठी बोला, गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जात मराठी,धर्म मराठी
- शान मराठी, अभिमान मराठी!
- मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात, हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ, पाहते मराठी शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी, मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मराठी माझी जात! मराठी माझा धर्म! मराठी माझी माती! मराठी माझं रक्त! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
"मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना... मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
- धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।। मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications