Maharashtra Weather अकोल्यात सर्वाधिक तापमान, अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी शहरानुसार तापमान जाणून घ्या
Maharashtra Weather Highest Temperature in Akola : राज्यात इतर जिल्ह्यांपेक्षा नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा आदी शहरात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. अकोल्यात पारा चाळीशीपार पोहचला आहे. विदर्भासह राज्यातही हळूहळू तापमानात वाढ होत आहे. 25 मार्च 2025 रोजी मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला असून येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्रात पावसाची तर विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत. राज्यात काल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे ४०.२ तर सर्वात कमी अहिल्यानगर येथे १५.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुरळ ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा : Health Tips : तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळ्यात दिवसभर किती ग्लास पाणी प्यावं, जाणून घ्या सविस्तर
ठळक घडामोडी
- एक वाऱ्याची द्रोणीय रेषा दक्षिण छतीसगड ते उत्तर आंतरिक तामिळनाडू पर्यंत (अंतर्गत महाराष्ट्र व अंतर्गत कर्नाटक मार्गे) जात आहे.
- तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २९ आणि ३० मार्च रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
- दुसरीकडे उन्हाळ्यात महाराष्ट्रात नागपूर, अकोला आणि इतर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असते.
- अशा स्थितीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते.
- कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
- राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
- राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल किमान तापमान (अंश सेल्सिअस)
- मुंबई (कुलाबा) ३२.२/२४.७
- सांताक्रूझ ३३.०/२२.७
- अलिबाग /२०.३
- रत्नागिरी ३३.५/२३.३
- पणजी (गोवा) ३३.६/२५.०
- डहाणू ३५.४/२१.६
- पुणे ३८.२/१८.६
- लोहगाव ३९.५/२२.८
- अहिल्यानगर ३७.९ /१५.७
- जळगाव ३९.३/१६.४
- कोल्हापूर ३७.५/२४.६
- महाबळेश्वर ३२.७/१९.६
- मालेगाव ३९.२/१९.२
- नाशिक ३७.०/१७.८
- सांगली ३८.३/२४.४
- सातारा ३७.७/२१.१
- सोलापूर ३८.९/२६.४
- धाराशिव ३७.०/२२.४
- छत्रपती संभाजीनगर ३८.५/१९.५
- परभणी ३८.८/२०.१
- बीड ३९.४ / १९.५
- अकोला ४०.२/२०.३
- अमरावती ३९.४/१९.८
- बुलढाणा ३७.०/२२.५
- ब्रह्मपुरी ३९.०/ १९.०
- चंद्रपूर ३९.८/-
- गोंदिया ३६.५/१७.४
- नागपूर ३७.६/१८.४
- वाशिम, वर्धा ३९.०/१९.०
- यवतमाळ २१.२.
हेही वाचा : Nagpur Temperature Updates : नागपूरसह विदर्भाला उष्णतेचा तडाखा बसणार,एप्रिलमध्ये एवढे वाढणार तापमान!
हेही वाचा : Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणात उन्हाच्या झळा












Click it and Unblock the Notifications