Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणात उन्हाच्या झळा

Maharashtra Weather : आता उष्णतेच्या झळा बसत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाडा, कोकणात चोवीस तासांत किंचित तापमान वाढलेले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान वर्धा येथे तर सर्वात कमी पुणे येथे नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे ऐन उन्हाच्या कडाक्यात मराठवाड्यात पावसाची आज शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील.

Maharashtra Weather

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान कसे होते?

  • गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
  • कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
  • मध्य महाराष्ट्र व मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
  • राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
  • राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख

शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) ३३.४/२३.६, सांताक्रूझ ३४.०/२१.९, अलिबाग ३३.०/-, रत्नागिरी ३५.०/२२.८. पणजी (गोवा) ३५.०/२२.४. डहाणू ३३.३/२०.५. पुणे ३६.८/१५.४. लोहगाव ३८.४/१९.६, अहिल्यानगर १५.५. जळगाव ३५.८/२०.२, कोल्हापूर ३६.६/२१.२, महाबळेश्वर ३१.७/१६.६, मालेगाव ३६.०/१७.८, नाशिक ३४.७/१६.०, सांगली ३७.४/२१.०, सातारा ३६.७/१८.४. सोलापूर ३८.८/२३.०, धाराशिव ३८.२/२०.४, छत्रपती संभाजीनगर ३५.२/२०.६, परभणी ३८.१/२०.५, बीड /- अकोला ३७.७/ २०.८, अमरावती ३८.०/१९.५. बुलढाणा ३३.५/२१.६, ब्रह्मपुरी ३८.२/ २०.४, चंद्रपूर ३७.२/-, गोंदिया ३५.२/२०.६, नागपूर ३८.२/१९.८. वाशिम ३७.६/-, वर्धा ३८.५/२०.९, यवतमाळ ३७.८ २२.४.

कुठे सर्वात जास्त तापमान कुठे सर्वात कमी?

हवामान विभाग पुणे आयएमडी (IMD Pune) नुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ३८.५ अंश सेल्सियस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १५.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.

विदर्भातील हवामान अंदाज

२३ मार्च ते २८ मार्चदरम्यान विदर्भात हवामान कोरडे राहील.

कोकणातील हवामानाची स्थिती

२३ मार्च ते २८ मार्चदरम्यान विदर्भात हवामान कोरडे राहील.

मराठवाड्यात कसे राहील हवामान?

आज २३ मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर २४ ते २८ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील हवामान स्थिती

आज २३ मार्च रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर २४ ते २८ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे पुणे हवामान विभागाने म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+