Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उमेदवार पाडायचे की लढवायचे, उद्या घेणार निर्णय; मला संपविण्याचा काहींचा डाव - मनोज जरांगेंचा आरोप

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी आचारसंहिता लागताच सरकारवर जोरदार निशाणा साधला. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे असणार असून कोणाला पाडायचं अन् कोणाला जिंकवायचे याचा निर्णय उद्या होणार आहे. उद्या 20 तारखेला रविवारी आंतरवाली सराटीत बैठक होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

उद्या निर्णय जाहीर होणार

विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करत लढायचं यासाठीच समाज बांधवांसमोर उद्या निर्णायक बैठक होणार आहे. यावेळी या बैठकीला जेवढे समाजबांधव येतील त्यांच्यासमोरच आम्ही निर्णय जाहीर करणार, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Manoj Jarange Patil

एक तर त्यांना मला मारून टाकावं लागेल

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी असो की महायुती त्यांना संताजी धनाजी सारख पाण्यात मीच एकटाच दिसतो. माझ्यावर कोणाचाच अस्त्र चालू शकत नाही. त्यामुळे उद्या वेळ आली तर मी मराठ्यांसाठी मी मरेलही. सरकारकडे आणि विरोधकांकडे शेवटच अस्त्र तेच आहे. एक तर मला मारून टाकावे लागेल. माझ्या जवळच्या असणार्‍या लोकांना जर तुम्ही डाग लावण्याचा प्रयत्न केला असल तर तो उमेदवार घेणारा अन् देणारा देखील संपवणार, असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

माझ्या विरोधात मोठा डाव रचला गेला

लढायचं ठरलं तर आमच्यासाठी वेळ कमी नाही. आमची गेल्या 13 महिन्यापासून तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडे देखील चांगले गब्बर उमेदवार आहेत. मात्र यातून त्यांना द्यायचा एक आहे. तसेच माझ्याकडे पण लय इच्छुक आहेत. आम्ही एक जरी उमेदवार दिला 100 जरी इच्छुक असले तर सर्वजण एकाच्याच बाजूला उभे राहतील. 20 आणि 25 दिवसात माझ्या विरोधात खूप मोठा डाव रचला आहे. पण, मी त्याला घाबरत नाही. निर्णय उद्या काय होईल माहिती नाही. पण जे काही ठरेल एक ही गरीब सामान्य ओबीसी सहित मी त्यांना वापस जाऊ देणार नाही.

मी फक्त येवल्यावाल्याला बोललो, भुजबळांवर निशाणा

जरांगे म्हणाले की, 2024 मध्ये 75 वर्षात बघितलेले स्वप्न साकार होईल, त्यांचा न्यायचा दिवस येईल. मी आतापर्यंत काही गाव खेड्यातल्या ओबीसीला दुखावलं नाही, मी दुखावणार असतो तर त्याच टायमाला बोललो असतो फक्त मी त्या येवल्यावाल्याला बोललो, त्याच्या समाजाला सुद्धा नाही, अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+