नीलेश राणे बाजी मारणार की वैभव नाईक गड जिंकणार? वाचा कुडाळ-मालवणचा ग्राउंड रिपोर्ट Video
Kudal-Malvan Assembly elections 2024 Nilesh Rane vs vaibhav Naik : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नीलेश राणे आणि महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यातील थेट लढत आहे. हा सामना केवळ मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नसून तो महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव पाडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विद्यामान आमदार वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र नीलेश राणे यांच्या अत्यंत अटीतटीची लढत होत आहे. 'शिवसेनेचा बालेकिल्ला' अशी या मतदारसंघाची ओळख आहे. मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली. मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत.

या मतदारसंघात एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही वैभव नाईक आणि नीलेश राणे यांच्यातच होणार आहे.महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला. मात्र पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपच्या नीलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे. आता नीलेश राणे यांच्यासाठी ही लढत राजकीय पुनरुत्थानाची तर वैभव नाईक यांच्यासाठी तिसऱ्यांदा विजय मिळवून आपले स्थान मजबूत करण्याची आहे.
विकासाचा रखडलेला अजेंडा
या मतदारसंघात पर्यटन आणि रोजगाराच्या संधींवर भर दिला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत कोणतेही मोठे प्रकल्प येथे आलेले नाहीत. डिझ्नीलँड आणि सी वर्ल्ड प्रकल्प: पर्यटनवृद्धीसाठी प्रस्तावित हे प्रकल्प अद्याप लालफितीत अडकले आहेत. टांळाबा धरण प्रकल्प: पाणीटंचाईसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा हेतू असलेला हा प्रकल्पही रखडलेला आहे. रोजगाराचा अभाव: औद्योगिक क्षेत्रे असूनही मोठ्या उद्योगांअभावी युवकांसमोर रोजगाराचे मोठे संकट आहे.
हेही वाचा : येवल्यात छगन भुजबळांना कांदा हसवणार, रडवणार की मनोज जरांगे झुंझावणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट
पुतळा दुर्घटनेचे पडसाद
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळल्याची दुर्घटना आणि त्यातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. या प्रकरणावर महायुतीने सत्ताधारी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
राणे विरुद्ध नाईक : संघर्षाची पुनरावृत्ती
- 2009 : नारायण राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर वैभव नाईक यांचा पराभव केला.
- 2014 : वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव करत "जायंट किलर" म्हणून ओळख मिळवली.
- 2019 : वैभव नाईक यांनी राणे समर्थक रणजित देसाई यांना हरवत दुसऱ्यांदा विजय मिळवला.

महाविकास आघाडीचे मुद्दे :
- शिवसेनेच्या पारंपरिक विकास कामांचा वारसा.
- पुतळा दुर्घटनेतील भ्रष्टाचारावर टीका.
महायुतीचे मुद्दे:
- राणे घराण्याचा विकासाचा अजेंडा.
- मतदारसंघात उद्योग, रोजगार, आणि पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन.
हेही वाचा : कणकवलीमध्ये नितेश राणे, पारकर यांच्यात कुणाचं पारडं जड? जाणून घ्या सविस्तर...
निवडणुकीतील शक्यता
या लढतीचा निकाल केवळ स्थानिक मुद्द्यांवर नाही तर शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादीचे विभाजन, आणि मतदारांचे प्रादेशिक व जातीगत समीकरणांवरही अवलंबून असेल.












Click it and Unblock the Notifications