Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कणकवलीमध्ये नितेश राणे, पारकर यांच्यात कुणाचं पारडं जड? जाणून घ्या सविस्तर...

Kankavli Assembly Elections 2024 Nitesh Rane vs Sandesh Parker : कणकवली विधानसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत होत आहे. हा मतदारसंघ नारायण राणे यांच्या राजकीय वारशाचा भाग मानला जातो. त्यामुळे नितेश राणे यांच्यासाठी ही निवडणूक सन्मान टिकविण्याची, तर संदेश पारकर यांच्यासाठी नवा इतिहास रचण्याची संधी असेल.

भाजपच्या नितेश राणे यांची जमेची बाजू

नितेश राणे हे सध्या कणकवलीचे आमदार असून गेल्या दहा वर्षांतील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 84,504 मते मिळवून विजय मिळवला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या वडिलांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील लढत नितेश राणे आणि संदेश पारकर यांच्यात रंगणार आहे. मतदार विकास आणि स्थानिक प्रश्नांच्या आधारावर मतदान करतील की भावनिक मुद्द्यांवर? याचे उत्तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे.

Kankavli Assembly Elections 2024 Nitesh Rane vs Sandesh Parker

ठाकरे गटाचे संदेश पारकर; नवा चेहरा, नवी रणनीती

संदेश पारकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा ऐनवेळी झाल्याने प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. मात्र, त्यांनी मतदारांना भावनिक साद घालत स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर भर दिला आहे. संदेश पारकर यांना महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे पाठबळ आहे, पण त्यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे.

हेही वाचा : आजी-माजी आमदार समोरासमोर, नांदगावमध्ये चौरंगी लढतीने आली रंगत

इतर उमेदवारांचे अस्तित्व

मतदारसंघात अपक्ष संदेश सुदाम पारकर, बंदेनवाज हुसेन खानी, गणेश माने आणि बसपचे चंद्रकांत जाधव हे उमेदवारही मैदानात आहेत. त्यांची भूमिका मतविभाजनात महत्त्वाची ठरू शकते.

2019 आणि 2024 च्या निवडणुकीतील फरक

2019 मध्ये नितेश राणे यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभव केला होता. मात्र, 2024 च्या निवडणुकीत उद्धव सेनेचा प्रबळ उमेदवार संदेश पारकर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे.

हेही वाचा : येवल्यात छगन भुजबळांना कांदा हसवणार, रडवणार की मनोज जरांगे झुंझावणार? वाचा ग्राऊंड रिपोर्ट

प्रमुख प्रश्न आणि प्रचाराचे मुद्दे

विकासकामे : मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, रोजगारनिर्मिती हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.
भावनिक मुद्दे : नितेश राणे यांच्या विकासकामांविरोधात प्रचार करणाऱ्या पारकर यांनी मतदारांना नवा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय समीकरणे : महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा या निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात.

Take a Poll

असे आहेत मतदार

  • एकूण मतदारसंख्या : 2,31,740
  • स्त्री: 1,17,359
  • पुरुष: 1,14,379
  • तृतीयपंथी: 2

हेही वाचा : नीलेश राणे बाजी मारणार की वैभव नाईक गड जिंकणार? वाचा कुडाळ-मालवणचा ग्राउंड रिपोर्ट Video

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील निकाल:

  • नितेश राणे (भाजप): 84,504
  • सतीश सावंत (शिवसेना): 56,388
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+