Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आमदार संग्राम जगताप यांना पितृशोक! माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन, नगरकरांसाठी होते काका..

Former MLA Arun Kaka Jagtap passes away : नगरकरांचे काका आणि माजी आमदार अरुण काका जगताप अहिल्यानगर (पुर्वीचे अहमदनगर) यांचे आज 2 मे 2025 रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.

माजी आमदार अरुण जगताप यांना प्रकृती अस्वास्थामुळे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील राजकारणातील मात्तबर नेता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Former MLA Arun Kaka Jagtap passes away

5 एप्रिलला त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मात्तब्बर नेत्यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. जवळपास एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली पण अखेरीस त्यांची प्राणज्योत मावळली.

अरुण जगताप यांच्याविषयी..

अरुण जगताप हे अहिल्यानगर आणि पुर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील होते.

अरुण जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते नगरकरांसाठी 'काका' नावाने परिचित होते. नगरमधील ते लोकप्रिय आमदार आणि राजकारणी होते.

काँग्रेसमधून राजकीय कारकिर्द

अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

कधी आहेत अंत्यसंस्कार?

अरुण जगताप यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे, नगरकरांचे काका गेले अशी भावना आणि दुःख व्यक्त होत आहे. अरुण जगताप यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार नगर येथील अमर धाम मध्ये केले जाणार आहेत.

हेही वाचा : सीएसकेच्या 'या' दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन, आयपीएल दरम्यान दु:खाचा डोंगर कोसळला

हेही वाचा : धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे निधन, अंजली दमानिया यांची खळबळजनक पोस्ट

हेही वाचा : जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन, मराठी चित्रपट सृष्ट्रीतील त्यांचा प्रवास वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+