सीएसकेच्या 'या' दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन, आयपीएल दरम्यान दु:खाचा डोंगर कोसळला
IPL 2025 आयपीएल 2025 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने चेन्नईचा पराभव केला आणि सीझनमधील त्यांचा चौथा विजय नोंदवला. त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बद्दल होत मुंबईने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा हा आठ सामन्यांतील सहावा पराभव होता. ते अजूनही पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे. या सामन्यादरम्यान चेन्नईचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले होते.
चेन्नईच्या खेळाडूंना काळ्या पट्ट्या बांधलेले पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. चाहत्यांना नेमका प्रश्न पडला की नेमकं असं काय घडलं आहे. जेणेकरुन चेन्नई खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहे. सामन्यानंतर झालेल्या सादरीकरण समारंभात, समालोचक हर्षा भोगले यांनी माहिती दिली की चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांचे निधन झाले आहे. याच कारणास्तव, चेन्नईच्या खेळाडूने मुंबईविरुद्धच्या सामन्यात काळी पट्ट्या बांधून श्रद्धांजली दिली.

न्यूझीलंडचा हा खेळाडू मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात खेळत नव्हता. कॉनवे त्याच्या घरी परतण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडियावर अंकाऊंट वर पोस्ट करत ही माहिती देत कॉनवेच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. संघाने पोस्ट करत लिहले कॉनवेच्या वडिलांचे निधन झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत. या सीझनमध्ये त्याने संघासाठी 3 सामन्यात 94 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एका अर्धशतक झळकावलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने 5 विकेटच्या मोबदल्यात 176 धावा केल्या, त्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्ससाठी खळबळ उडवून दिली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत कहर केला. मुंबईने या हंगामात चौथा विजय मिळवला.
मुंबईचा चौथा विजय
मुंबई इंडियन्सनेही मागील पराभवाचा बदला घेतला आहे. सीझनच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आता मुंबईने चेन्नईचा पराभव करून त्याचा बदला घेतला आणि सामना 9 विकेट्सने जिंकला. चेन्नईने मुंबईला 177 धावांचे लक्ष्य दिले होते.
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला प्लेऑफच तिकीट मिळणं खूप कठीण आहे, त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. सीएसकेने आयपीएल 2025 च्या 18 व्या सीझमध्ये 8 पैकी 6 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. पॉइंट टेबलमध्ये त्यांचा संघ शेवटच्या म्हणजेचं 10 व्या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट (-1.392) देखील सर्वात वाईट आहे.












Click it and Unblock the Notifications