Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे निधन, अंजली दमानिया यांची खळबळजनक पोस्ट

Rajendra Ghanwat wife Manali Ghanwat Death : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचं नाव समोर आल्यानंतर मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचा पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात आकस्मिक निधन आहे.

ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांचे सोमवार 21 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

dhananjay munde on anjali damania

मात्र या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी एक ट्टिट करुन हा मृत्यू आकस्मिक आणि संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणात धनंजय मुंडे आणि त्यांच्या कंपन्यांशी संबंधित राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे ?

अंजली दमानिया यांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, खूप खूप धक्कादायक ! राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत, ह्याच राज घनवट ने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत, व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावणकुळे यांच्या कडे केली होती.

ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असं त्यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+