माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून..राजीनाम्याआधी धनंजय मुंडेंचे ट्विट चर्चेत, पद सोडण्याचं हे कारण
Dhananjay Munde's tweet in discussion : महाराष्ट्रातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण गाजल्यानंतर आरोपीशी हितसंबंध असल्यावरुन धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्यानंतर निर्घुन हत्येचे फोटोही समोर आले असून धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा देण्यासंदर्भातील माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर दिली आहे. यामध्ये त्यांनी आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली पण कोणत्या करणाने राजीनामा देत आहोत हेही स्पष्ट केले. यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची किनार जरी असली तरी राजीनाम्याचे ठोस कारण मात्र वेगळेच आहे.

काय आहे धनंजय मुंडेंचे ट्विट
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे."
हेही वाचा : कृषीमंत्री धनंजय मुंडे पहाटे 3 वाजता जरांगेंच्या भेटीला; मराठवाड्यात राजकीय भूकंप, काय ठरलं!
..म्हणून मी राजीनामा देत आहे!
माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
धनंजय मुंडेंचे हेच ते ट्विट
धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला - मुख्यमंत्री फडणवीस
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढील कारवाईसाठी हा राजीनामा राज्यपालांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन परिसरात दिली. बीड जिल्ह्यातील मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडे यांच्या निकटवर्तीयांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विरोधक तसंच भाजप आमदार सुरेश धस अनेक दिवसापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल, राज्यात संतापाची लाट
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये आज स्वयंघोषित कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ युवकांनी बीड शहरात रॅली काढून बीड बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बीडसह मस्साजोग गावात बंदोबस्त वाढवला आहे.
हेही वाचा : 'भयंकर', 'राक्षसी'... संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आले समोर; पाहताक्षणी अंगावर येतो काटा
हेही वाचा : Dhananjay Munde resigns : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाल्मिक कराडशी हितसंबंध भोवले!












Click it and Unblock the Notifications