'भयंकर', 'राक्षसी'... संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आले समोर; पाहताक्षणी अंगावर येतो काटा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात या हत्येचे वर्णन केल्यानंतर महाराष्ट्र हादरला होता. यांच्या हत्येची चर्चा आजही होताना दिसत आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, याचे वर्णन ऐकून आजही मन सून्न होते. आता याच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे.

photos of Santosh Deshmukh murder

फोटो सीआयडीच्या हाती

संतोष देशमुख यांच्या ज्यावेळी हत्या करण्यात आली. तेव्हा काही आरोपींनी त्या घटनेचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागला होता. त्याच व्हिडीओचे स्क्रिन शाँट घेऊन सीआयडीने या हत्याकांडाचे फोटो काढले. तेच फोटो कोर्टात दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये जोडण्यात आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत.

भयंकर आहेत फोटो

सीआयडीने काढलेले फोटो अत्यंत भयंकर आहेत. संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे केली गेली, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. मानेवर पाय ठेवणे, दांडक्याने मारणे, मानेवर पाय ठेवणे असे प्रकार आरोपी करताना त्यात दिसत आहेत. संतोष देशमुख यांना उघडेही करण्यात आल्याचे दिसते. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी निर्लज्जपणे खिदीखिदी हसतानाही दिसत आहेत. संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते गतप्राण पडले असतानाही त्यांना मारहाण सुरु आहे.

चार्टशिटमध्ये यांची नावे

सीआयडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये हत्येच्या कटात वाल्मीक कराड, दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, फरार कृष्णा आंधळेचा अशा आठ जणांचा क्रमवार समावेश करण्यात आला आहे. सिद्धार्थ सोनवणे याचे नाव त्यातून वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+