Dhananjay Munde Net Worth : धनंजय मुंडेंची संपत्ती किती? सोने-चांदी आणि किती आहेत वाहने घ्या जाणून
Dhananjay Munde Net Worth : महाराष्ट्राचे तडफदार राजकारणी म्हणून परिचित असलेले धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील संशयित आरोपीसोबत हितसंबंध असल्याच्या कारणामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणाने राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे कारण जरी वैद्यकीय असले तरीही त्यांनी राजीनाम्याआधी केलेल्या पोस्टमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो पाहून आपण व्यथित झाल्याचे ते म्हटले आहे. विरोधकांचा दबाव आणि नैतिकता यामुळेच मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला असे बोलले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या संपत्तीची चर्चा होत आहे. धनंजय मुंडे यांची संपत्ती किती? हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; संतोष देशमुख प्रकरण भोवणार? CM - अजित पवारांच्या बैठकीत चर्चा
Dhananjay Munde Net Worth धनंजय मुंडेंची संपत्ती
- 2019 मध्ये धनंजय मुंडेंची संपत्ती 23 कोटी होती.
- धनंजय मुंडे हे मंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत, 2019 ते 2024 या काळात त्यांची संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे.
- धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटी रुपये किमतीची वाहने आहेत, यामध्ये टँकर ते बुलेटसह सात वाहने आहेत.
- धनंजय मु्ंडे यांच्याकडे सात लाख 3 हजारांचे 190 ग्रॅम सोने आहे तर दीड किलो चांदी आहे.
- धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाच्या नावावर सुमारे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे.
- गेल्या पाच वर्षात धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत 30.75 कोटींची भर पडली.
- धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावावर 31 लाख 78 हजारांची दोन वाहने असून 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने आणि दीड किलो चांदी आहे.
हेही वाचा : माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून..राजीनाम्याआधी धनंजय मुंडेंचे ट्विट चर्चेत, पद सोडण्याचं हे कारण
वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे जवळचे
असे सांगितले जाते की, संतोष देशमुख अपहरण प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत, धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील सर्व गोष्टींचे व्यवस्थापन कराड करत असल्याचे सांगितले जाते. वाल्मिक कराडसह धनंजय मुंडे यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसून येतात. वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणाशी संबंधित असून सध्या अटकेत आहे. त्यादरम्यान विरोधकांनी हाच धागा पकडत धनंजय मुंडे या्ंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्यांनी आज राजीनामाही दिला.
हेही वाचा : Dhananjay Munde resigns : अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाल्मिक कराडशी हितसंबंध भोवले!












Click it and Unblock the Notifications