"होय..मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला!", विधानभवनात जाण्यापुूर्वी CM फडणवीसांची स्पष्टोक्ती
Santosh Deshmukh case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुन हत्या झाली होती. महाराष्ट्रात हे प्रकरण गाजत असून हत्येनंतर आता या प्रकरणातील काही फोटो आरोपपत्रातून समोर आले आहेत. या फोटोत संशयित आरोपींनी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे दिसले. यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्यावरुन धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, या आरोपपत्रातील फोटो व्हायरल झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला.
यासंदर्भात विधानभवनात पोहण्यापुर्वी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख खूनानंतर धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अपहरण प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा द्यावा अशी विरोधी पक्षांनी मागणी धरुन लावली होती. त्यानंतर धनंजय मुंडे हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या प्रकरणी मला काही बोलायचं नाही, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
हत्याकांडाचे थरकाप उडवणारे फोटो
संतोष देशमुख यांच्या ज्यावेळी हत्या करण्यात आली. तेव्हा काही आरोपींनी त्या घटनेचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागला होता. त्याच व्हिडीओचे स्क्रिन शाँट घेऊन सीआयडीने या हत्याकांडाचे फोटो काढले. तेच फोटो कोर्टात दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये जोडण्यात आले आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत.
फोटोत आरोपी हसताना दिसताहेत
सीआयडीने काढलेले फोटो अत्यंत भयंकर आहेत. संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे केली गेली, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. मानेवर पाय ठेवणे, दांडक्याने मारणे, मानेवर पाय ठेवणे असे प्रकार आरोपी करताना त्यात दिसत आहेत. संतोष देशमुख यांना उघडेही करण्यात आल्याचे दिसते. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपी निर्लज्जपणे खिदीखिदी हसतानाही दिसत आहेत. संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते गतप्राण पडले असतानाही त्यांना मारहाण सुरु आहे.
चार्टशिटमध्ये यांची नावे..
सीआयडीने दाखल केलेल्या चार्टशीटमध्ये हत्येच्या कटात वाल्मीक कराड, दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, फरार कृष्णा आंधळेचा अशा आठ जणांचा क्रमवार समावेश करण्यात आला आहे. सिद्धार्थ सोनवणे याचे नाव त्यातून वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications