काँग्रेसने 4थी यादी केली जाहीर; 14 जणांचा समावेश; औरंगाबाद पूर्व व अंधेरी पश्चिममधील उमेदवार बदलले!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या विधानसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.
यात 14 उमेदवारांचा समावेश असून शिवसेनेकडून जाहीर झालेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मविआ अधिकृत उमेदवार कोण, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे.

पहिल्या तीन यादीत इतके उमेदवार रिंगणात!
काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. तर, दुसऱ्या यादीत 23 आणि तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, आता काँग्रेसने 14 उमेदवारांची यादी जाहीर केली.
हे ही वाचा : काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर; माणिकराव ठाकरे, सचिन सावंतसह 16 जणांची नावं, कुठून कोणाला संधी
काँग्रेसची 4 थी यादी
1.अमळनेर - अनिल शिंदे
2.अमरेड - संजय मेश्राम
3.आरमोरी - रामदास मश्राम
4.चंद्रपूर - प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर - संतोषसिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके
हे ही वाचा : कॉंग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 196 उमेदवार जाहीर
औरंगाबाद पूर्व व अंधेरी पश्चिममधील नाव बदलली
- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भगिरथ भालकेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे भगिरथ भालके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता काँग्रेसकडूनअधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने 4 थ्या यादीत अंधेरी पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या जागांवरील उमेदवारांची नावे बदलली आहेत.
- सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज देखील भरणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे.
- काँग्रेसने तिसऱ्या यादीत अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांनी उमेदवारी दिली होती, मात्र ती रद्द करुन अशोक जाधव यांना देण्यात आली आहे. तर, औरंगाबाद पश्चिममधून मधूकर देशमुख यांच्याऐवजी लहू शेवाळे यांना देण्यात आलीय.












Click it and Unblock the Notifications