काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर; माणिकराव ठाकरे, सचिन सावंतसह 16 जणांची नावं, कुठून कोणाला संधी
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात प्रचंड घडामोडी होत आहेत. दरम्यान, काँग्रेसने शनिवारी सकाळी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. तोच रात्री पुन्हा 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीत मुंबईतील मतदारसंघाचाही समावेश आहे.तर आतापर्यंत काँग्रेसने 87 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनाही दिग्रसमधून तिकीट देण्यात आले आहे. तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी मिळाली आहे.

विशेष बाब म्हणजे, काँग्रेसने पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर आज शनिवारी काँग्रेसने 16 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत एकूण 87 उमेदवारांची घोषणा केली आहे.
हे ही वाचा : कॉंग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 196 उमेदवार जाहीर
काँग्रेसची तिसरी यादी
खामगाव- राणा दिलीपकुमार सानंदा
नांदेड साऊथ- मनोहर अंबाडे
देगलूर - निवृत्तीराव कांबळे
अंधेरी पश्चिम- सचिन सावंत
मेळघाट- डॉ. हेमंत नंदा
चिमोटे गडचिरोली- मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस - माणिकराव ठाकरे
वांद्रे पश्चिम- असिफ झकारिया
सांगली- पृथ्वीराज पाटील
हे ही वाचा : काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर! 'या' इच्छुकांना मिळाली उमेदवारी,
तुळजापूर- कुलदीप धिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर नॉर्थ- राजेश लाटकर
मुखेड- हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य- एजाज बेग अली बेग
चांदवड- शिरीषकुमार
कोतवाल इगतपुरी- लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे












Click it and Unblock the Notifications