कॉंग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 196 उमेदवार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडूकीच्या प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप आता अंतीम टप्प्यात आली आहे.

कॉंग्रेसने आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 23 जणांचा समावेश आहे. या आधी कॉंग्रेसने पहिल्या यादीत 48 जणांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत कॉंग्रेसकडून 71 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

congress

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्यूला आता समोर आला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तिन्ही प्रमुख पक्ष 85 ऐवजी 90-90-90 जागा लढणार आहेत. अशी माहिती कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे, याबाबतचं वृत सामना या वृतपत्राने दिलं आहे. सामना वृतपत्रात म्हटलं आहे की, जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आलं असून 18 जागा त्यांना सोडल्या असल्याचं सांगितलं आहे.

अशी आहे कॉंग्रेसची दुसरी यादी

1. भूसावळ-डॉ. राजेश मानवतकर
2. जळगाव जामोद- स्वाती वाकेकर
3. अकोट - महेश गणगणे
4. वर्धा - शेखर शेंडे
5. सावनेर - अनुजा केदार
6. नागपूर दक्षिण - गिरीश पांडव
7. कामठी - सुरेश भोयर
8. भंडारा - पूजा ठवकर
9.अर्जुनी मोरगाव - दिलीप बनसोड
10.आमगाव - राजकुमार पुरम
11.राळेगाव - वसंत पुरके
12.यवतमाळ - अनिल मांगुलकर
13.आर्णी - जितेंद्र मोघे
14.उमरखेड - साहेबराव कांबळे
15.जालना - कैलास गोरंट्याल
16.औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
17. वसई : विजय पाटील
18.कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
19.चारकोप - यशवंत सिंग
20.सायन कोळिवाडा : गणेश यादव
21.श्रीरामपूर : हेमंत ओगले
22. निलंगा : अभय कुमार साळुंखे
23.शिरोळ : गणपतराव पाटील

ठाकरे गटाकडून आतापर्यंत 80 उमेदवारांचे नावे निश्चित

आतापर्यंत महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले उध्दव ठाकरे गटाची दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. पहिल्या यादीत ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता 15 उमेदवारांची यादी समोर आली आहे. ही नावं 'सामना' या वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत ठाकरे गटाकडून 80 उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

कॉंग्रेसकडून आतापर्यंत 71 उमेदवारांची नावे निश्चित

कॉंग्रेसकडून आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत ४८ उमेदवारांचे नावे निश्चित करण्यात आली असून दुस-या यादीत 23 जणांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून आतापर्यंत एकूण 71 उमेदवारांचे नाव निश्चित करण्यात आली आहे.

शरद पवार गटाकडून आतापर्यंत 45 उमेदवारांचे नावे निश्चित

शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी आपली यादी पहिली यादी जाहीर केली आहे. यात एकूण 45 उमेदवारांचे नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार बीडच्या आष्टीतून महेबूब शेख सह अनेक नविन चेह-यांना संधी देण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+