Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Buldana accident : बुलडाण्यात भीषण अपघात! पुणे-परतवाडा एसटी, बोलेरो- लक्झरी बसची धडक, 5 ठार; 24 जखमी

Buldana accident news updates : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर विचित्र अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर जवळपास 24 जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे परतवाडा एसटी बस आणि लक्झरी आणि बोलेरो जीपमध्ये झाला.

या अपघातानंतर एकच धावपळ उडाली असून जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 24 जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Buldana accident news updates

प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. यावेळी एसटी महामंडळाची पुणे परतवाडा बस ही जात असताना
ती बोलेरो आणि लक्झरी बस या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास चोवीस जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

लक्झरी बसचा चालक फसला

अपघातनंतर खासगी लक्झरी बसमध्ये त्याच बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचे काम जोमाने पोलिस करत आहेत. अपघातग्रस्त तिन्ही वाहनांचा चुक्काचूर झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलिस बचावकार्य आणि उपाय करत आहेत.

हेही वाचा ः अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात; बसने कारला धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, टीमकडून मिळाली मोठी अपडेट

असा घडला अपघात

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव - शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यावर हा अपघात झाला. पुण्याहून परतवाडा येथे एसटी बस जात असताना समोरुन आलेल्या बोलेरो कारची एसटी बसला धडक बसली. तितक्यात मागून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्सही धडकली आणि अपघात झाला.

भल्या पहाटे आला धाडकन् आवाज

भल्या पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. त्यावेळी बस आणि लक्झरीमधील बरेच प्रवासी साखरझोपेत होते. त्यांना अचानक हादरा बसला आणि धाडकन् आवाज आला. या आवाजाने अनेकजणांना धडकी भरली तर काहीजण ट्रॅव्हल्समध्येच कोसळले. यामध्ये तिन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले तर या दुर्दैवी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली तसेच पोलिसही जलदगतीने घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा ः तेलाचा टँकर उड्डाणपुलावरुन कोसळून तेलाचा उडाला भडका; चालकाचा कोळसा; मुंबईत भयंकर अपघात

हेही वाचा ः Video! 'त्या' एक्सप्रेसचा मोठा अपघात, तब्बल 11 डबे आले थेट जमिनीवर, किती जखमी, किती मृत्यू? वाचा

हेही वाचा ः पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट; अपघात की पुतिन यांच्या हत्येचा होता कट?, पाहा- थरारक VIDEO

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+