Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात; बसने कारला धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल, टीमकडून मिळाली मोठी अपडेट

Aishwarya Rai Car Accident News : बॉलिवूड अभिनेत्री तथा विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनच्या कारचा अपघात झाला आहे. त्या कारमध्ये ऐश्वर्या राय देखील होती. बुधवारी सायंकाळच्या वेळेला हा अपघात झाल्याची बातमी समोर आली. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुंबईच्या बेस्ट बसने ऐश्वर्याच्या कारला पाठिमागून धडक दिली. दरम्यान, या अपघातात सुदैवाने ऐश्वर्या रायला काहीही झालेले नाही. त्याचबरोबर तिच्या कारला देखील खरचले देखील नाही, अशी माहिती ऐश्वर्या रायच्या टीमकडून देण्यात आलेली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या जवळच्या लोकांनी काही माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला काहीही झालेले नाही. तर तिच्या कारला देखील बसचा धक्का लागलेला नाही. परंतु, मुंबईतील रस्त्यावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ऐश्वर्याचे सुरक्षारक्षक हे बस ड्रायव्हरशी संवाद साधताना दिसले. अवघ्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये त्या ठिकाणाहून ऐश्वर्या रायची कार निघून गेली. त्यापाठोपाठ बस देखील निघून गेली.

aishwarya rai bachchan

नेमकी काय घटना घडली होती?

ऐश्वर्याच्या कार आणि बसमध्ये झालेल्या टक्करचा व्हिडिओ पापाराझीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला होता, त्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. ऐश्वर्या ठीक आहे की नाही याची त्यांना काळजी वाटू लागली. व्हिडिओ क्लिपमध्ये असे दिसून येते की बसने ऐश्वर्याच्या कारला मागून धडक दिली. त्यांच्या सुरक्षा पथकाने ताबडतोब गाडीतून उतरून परिस्थिती हाताळली.

गाडीला एकाही जागी धक्का लागलेला दिसत नाही. कारचे कोणतेही नुकसान झालेले नाही. सुरक्षा रक्षकांनी बस ड्रायव्हरशी काही सेकंद संवाद केला. त्यानंतर बस व कार दोन्ही त्या ठिकाणाहून निघून गेले. परंतु, व्हायरल व्हिडिओमुळे चाहत्यांनी ऐश्वर्याबाबत चिंता व्यक्त केली. तर हा अपघात झालेला नाही, असे देखील समोर आलेले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+