मुंबई मनपा निकाल: अखेरच्या टप्प्यात हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरेंची मुसंडी, BJPच्या जागा घटल्याने रंगत
BMC Election Results Live : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election Results) शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये एकतर्फी वाटणारी निवडणूक आता 'काँटे की टक्कर' कडे झुकताना दिसत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शेवटच्या सत्रात मोठी मुसंडी मारली असून भाजपच्या जागांचा आकडा घटला आहे. ही आकडेवारी १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.४५ पर्यंतची आहे.

शेवटच्या फेऱ्यांमधील ताज्या घडामोडी
दुपारपर्यंत भाजप आणि शिंदे गट ज्या वेगाने बहुमताकडे जात होते, त्या वेगाला आता ब्रेक लागला आहे. दुपारी १२२ जागांवर आघाडीवर असलेल्या महायुतीचा आकडा आता ११४ वर आला आहे. मुंबईत सध्या महायुती मॅजिक फिगरवर (बहुमतासाठी ११४ जागांची गरज) असली, तरी ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ जागांपर्यंत झेप घेत भाजपची धाकधूक वाढवली आहे.
महत्त्वाचे राजकीय निष्कर्ष
१. ठाकरेंचा 'कमबॅक'
शेवटच्या फेऱ्यांमध्ये मुंबईच्या अनेक बालेकिल्ल्यांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांना पिछाडीवर टाकले आहे. ठाकरे आणि मनसे यांची एकत्रित ताकद आता ७१ वर पोहोचली आहे.
२. महायुती काठावर
भाजप (८७) आणि शिंदे गट (२७) मिळून ११४ हा बहुमताचा आकडा गाठत आहेत. मात्र, हा आकडा ११४ च्या खाली आल्यास मुंबईत सत्तास्थापनेसाठी अपक्ष किंवा इतर पक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
३. काँग्रेसची निर्णायक भूमिका
काँग्रेसने २२ जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध केले आहे. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरेल. मुंबईत अजूनही काही जागांच्या फेऱ्या बाकी असल्याने मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षनिहाय ताजी स्थिती
पक्षआघाडी / जागा
भारतीय जनता पक्ष (BJP) - ८७
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - ६५
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) - २७
काँग्रेस (INC) - २२
मनसे (MNS) - ०६
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - ०३
इतर व अपक्ष - १०
ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मिळून ७२ नगरसेवक
भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे सध्या मॅजिक फिगर असून ११४ जागांवर सध्या त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुपारच्या सत्रात १२२ जागा होत्या त्या घटल्या असून ११४ वर आल्या आहेत. यानंतरही काही मोठे उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी स्थिती आहे.
हेही वाचा : Devendra fadnavis : 29 पैकी 'एवढ्या' मनपावर महायुतीचा विजय! CM फडणवीस काय म्हणाले? 5 मुद्द्यात भाषण
हेही वाचा : Maharashtra Municipal Election मुख्यमंत्री फडणवीसांचा 'भाऊ' पराभूत! धक्कादायक आणि टाॅप 10 निकाल वाचा
-
Papmochani ekadashi 2026 wishes marathi पापमोचनी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश -
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन!










Click it and Unblock the Notifications