भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी; नांदेड लोकसभेसाठी संतुक हंबर्डेंना तिकीट, कोणाला कुठून संधी
भाजपने सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात पक्षाने काँग्रेसचे बंडखोर नेते तथा विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांना देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर आत्तापर्यंत भाजपने तिन्ही यादीतून 146 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुतीत सर्वाधिक जागा भाजप लढणार हे निश्चित झाले आहे. भाजपच महायुतीत मोठा भाऊ आहे.
नांदेड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार केला जाहीर
भाजपने नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी डॉक्टर संतुक मारोतराव हंबर्डे यांना मैदानात उतरवले आहे. या ठिकाणी काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे निवडणूक होत आहे.

पहिल्या दोन यादीत किती उमेदवार झाले होते जाहीर
भाजपकडून पहिल्या यादीत सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता भाजपकडून आपली तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपनं तीन याद्यांमधून महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.
हे ही वाचा : भाजपाकडून दुसरी यादी जाहीर, जतमधून गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी
कोणाला कुठून मिळाली उमेदवारी...!
माळशिरसमध्ये राम सातपुते विरुद्ध जानकर
भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये माळशिरसमधून पुन्हा एकदा राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामसात पुते यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या हेत्या, या पराभवानंतर आता त्यांना भाजपकडून माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर या ठिकाणी शरद पवार यांच्याकडून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर अशी लढत होणार आहे.
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने आगामी महाराष्ट्र लोकसभा उप-चुनाव 2024 के लिए एक नाम पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/6rac0UCmwJ
— BJP (@BJP4India) October 28, 2024
आष्टीतून सुरेश धस यांना पुन्हा उमेदवारी
आष्टीमधून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आर्वीतून सुमीत वानखेडे, वर्सोव्यातून भारती लव्हेकर, कारंजा सई डहाळे, सावनेर आशिष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपा की केंद्रीय चुनाव समिति ने आगामी महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के लिए अपनी तृतीय सूची में निम्नलिखित नामों पर स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/CEupQanXi2
— BJP (@BJP4India) October 28, 2024
भाजपची तिसरी 25 उमेदवारांची यादी
- मुर्तिजापूर - हरीश पिंपळे
- कारंजा -सई डहाके
- तिवसा- राजेश वानखडे
- मोर्शी- उमेश यावलकर
- आर्वी-सुमित वानखेडे
- काटोल- चरणसिंग ठाकूर
- सावनेर - आशीष देशमुख
- नागपूर मध्य - प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले
- नागपूर उत्तर - मिलिंद माने
- साकोली - अविनाश ब्राह्मणकर
- चंद्रपूर - किशोर जोरगेवार
- आर्णी - राजू तोडसाम
- उमरखेड - किशन वानखेडे
- देगलूर- जितेश अंतापूरकर
- डहाणू - विनोद मेढा
- वसई - स्नेहा दुबे
- बोरीवली - संजय उपाध्याय
- वर्सोवा - भारती लव्हेकर
- घाटकोपर पूर्व - पराग शाह
- आष्टी - सुरेश धस
- लातूर - अर्चना पाटील
- चाकूरकर माळशिरस - राम सातपुते
- कराड उत्तर - मनोज घोरपडे
- पलूस -कडेगाव संग्राम देशमुख












Click it and Unblock the Notifications