भाजपाकडून दुसरी यादी जाहीर, जतमधून गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 22 जणांचा समावेश आहे. यादीमध्ये काही विद्यामान आमदारांचा समावेश आहे तर काही नवीन चेह-यांना सुध्दया संधी देण्यात आली आहे.

महायुतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाकडून आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभेसाठी दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर आज पुन्हा दुस-या यादीत आज 22 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेची या आधी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. महायुतीत भाजप एकूण 153 जागा लढणार असल्याची माहिती आहे. तर शिवसेना 80 जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
अशी भाजपची दुसरी यादी
1. धुळे ग्रामीण- राम भदाणे-
2. मलकापूर- चैनसुख संचेती
3. अकोट- प्रकाश भारसाखळे
4. अकोला पश्चिम -विजय अग्रवाल
5. वाशिम- श्याम खोडे
6. मेळघाट - केवलराम काळे
7. गडचिरोली- मिलिंद नरोटे
8. राजुरा- देवराम भोंगले
9. ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
10. वरोरा- करण देवताळे
11. नाशिक मध्य- देवयानी फरांदे
12.विक्रमगड- हरिश्चंद्र भोये
13. उल्हासनगर- कुमार आयलानी
14. पेण- रवींद्र पाटील
15. खडकवासला- भीमराव तापकीर
16. पुणे छावणी- सुनील कांबळे
17. कस्बापेठ- हेमंत रासने
18.लातूर ग्रामीण- रमेश कराड
19.सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
20. पंढरपूर- समाधान आवताडे
21. शिराळा-सत्यजित देशमुख
22. जत- गोपीचंद पडळकर
BJP releases the second list of 22 candidates for the #MaharashtraElection2024.
— ANI (@ANI) October 26, 2024
Elections in Maharashtra will be held on November 20, while the counting of votes will take place on November 23. pic.twitter.com/Vk9LgHaSom












Click it and Unblock the Notifications