एकाच कुटुंबातील तिघांची विष पिऊन आत्महत्या, एक जण गंभीर; धक्कादायक घटनेने 'हा' जिल्हा हादरला!
Crime News : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. संतोष कुराडेकर (44), सुवर्णा कुराडेकर, आणि मंगला कुराडेकर अशी मृतांची नावे आहेत. या धक्कादायक घटनेने बेळगाव शहर हादरले आहे.
या प्रकरणात सुनंदा कुराडेकर यांची अवस्था गंभीर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली. या घटनेमुळे जोशीमाळ परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास या कुटुंबाने विष प्राशन केल्याची माहिती आहे. प्रकृती गंभीर असलेल्या मुलीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. ही घटना शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! पंढरपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या;आषाढी एकादशीच्या दिवशी घटना, हे आलं कारण समोर
आत्महत्येचे पाऊल का उचलले?
या कुटुंबाने एकत्रित आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या मृ्त्यूशी झुंज देत असलेल्या सुनंदा कुराडेकर यांच्याकडून पोलिसांना याबाबत माहिती मिळू शकते. मात्र, त्यांची प्रकृती सद्या चिंताजनक आहे. या कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आत्महत्या करण्याचे नेमकं कारण काय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
पंढरपूरातही घडला होता असाच प्रकार?
कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची महिला नामक मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि 4 वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली.
मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजल्यानंतर तिचा पती म्हमाजी याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेने पंढरपूरसह महाराष्ट्र हादरला होता.












Click it and Unblock the Notifications