Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! पंढरपुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या;आषाढी एकादशीच्या दिवशी घटना, हे आलं कारण समोर

Solapur News Four members of same family commit suicide : सोलापूर तालुक्यातील पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे पत्नी आणि दोन मुलींनी रविवारी ६ जुलै २०२५ रोजी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आज सोमवारी ७ जुलैला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

एकीकडे राज्यात आषाढी एकादशीचा उत्सव सुरु असतानाच दुसरीकडे या दिवशीच पंढरपुरात मोठा उत्साह असताना आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले असतानाच तालुक्यातील कासेगावात एकाच कुटुंबातील चौघांनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

Solapur News Four members of same family commit suicide

घरगुती वादातून घटना

कासेगावात घरगुती वादातून काल रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार उघडकीस येताच मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस पोहचले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे.

आधी पत्नी मुलांची नंतर पतीची आत्महत्या

कासेगावात मोनाली म्हमाजी आसबे यांनी ऐश्वर्या व कार्तिक या दोन‌ मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, हा प्रकार रविवारी घडला, दरम्यान ही घटना समजताच पती म्हमाजी आसबे यांनीही आज सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेने हळहळ

एकाच कुटुंबाील चौघांनी आपले आयुष्य संपवले, या प्रकाराने पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुळ कारण नेमके काय आहे हेही पोलिस तपासत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+