Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित दादांसोबत अपघातात 'या' 4 जणांनी गमावले प्राण! कोण होते विदीप जाधव, शांभवी पाठक अन् पायलट, क्रु

Ajit pawar plane crash victims profiles : बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात राज्याने आपले काही कर्तव्यदक्ष अधिकारी आणि अनुभवी वैमानिक गमावले आहेत. या दुर्घटनेत विमानातील क्रू मेंबर्ससह अजित पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाचाही मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या जाण्याने त्यांच्या मूळ गावी आणि कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अजित दादांसोबत पायलट सुमीत कपूर, अंगरक्षक विदीप जाधव, सहवैमानिक शांभवी पाठक व क्रु मेंबर पिंकी माळी यांचा समावेश आहे. 

Ajit pawar plane crash

१. विदीप जाधव (वैयक्तिक सुरक्षा अधिकारी - PSO)

मुंबई पोलिस दलातील २००९ च्या बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव हे अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी असलेले जाधव हे आपल्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष स्वभावासाठी ओळखले जात होते. कर्तव्यावर असतानाच या दुर्घटनेत त्यांचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने सातारा जिल्हा आणि पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

२. कॅप्टन शांभवी पाठक (को-पायलट)

या विमानात को-पायलट म्हणून कार्यरत असलेल्या शांभवी पाठक यांनी अत्यंत कमी वयात आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. ग्वाल्हेरच्या वायुसेना बाल भारती स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एयरोनॉटिक्सची पदवी घेतली होती. शांभवी यांनी न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्या मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम पाहत होत्या. त्यांच्या निधनाने एक आश्वासक महिला वैमानिक काळाच्या पडद्याआड गेली आहे.

  • २०१८ मध्ये बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी एयरोनॉटिक्स, एविएशन आणि एयरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बीएससी (B.Sc) पदवी मिळवली.
  • व्यावसायिक पायलट बनण्यासाठी त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले.
  • २०१८ ते २०१९ दरम्यान त्यांनी कमर्शियल पायलट लायसन्स मिळवले. त्यांच्याकडे न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही देशांचे मान्यताप्राप्त परवाने होते.
  • शांभवी केवळ वैमानिक नव्हत्या, तर त्यांनी मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये 'असिस्टंट फ्लाईट इन्स्ट्रक्टर' म्हणूनही काम केले होते. त्यांच्याकडे 'फ्लाईट इन्स्ट्रक्टर रेटिंग (A)' देखील होती.

३. कॅप्टन सुमित कपूर (पायलट)

विमानाचे मुख्य सारथ्य कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे होते. चार्टर एविएशन क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव होता. बिझनेस जेट उडवण्यात ते माहिर मानले जात असत. अत्यंत शांत आणि जबाबदार वैमानिक म्हणून त्यांची ओळख होती. सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या कपूर यांचा अनुभवही या भीषण दुर्घटनेत अपुरा पडला. विशेष म्हणजे ते उड्डाणाआधी विमानाची सुरक्षितता तपासून घेत असत पण यावेळी नियतीने दगा दिला अन् कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

४. पिंकी माली (क्रू मेंबर)

विमानातील क्रू मेंबर पिंकी माली या मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील भैंसा गावच्या होत्या. त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक होते. पिंकी यांच्या निधनाची बातमी जौनपूरमध्ये पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा :  अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्र सुन्न; दुसऱ्या प्रयत्नात घडला घात! CCTVफुटेजमध्ये नेमकं काय दिसलं?

हेही वाचा :  अजित दादांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवारांना कशी दिली? रुग्णालयात घरी येताच आघात.. !

हेही वाचा :  Ajit Pawar Passes Away : विमान अपघातानंतर अजित पवारांची ओळख कशी पटली? काय काय सापडलं..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+