अजित दादांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवारांना कशी दिली? रुग्णालयात घरी येताच आघात.. !
Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व आज कायमचं शांत झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राज्यासह अजितदादांच्या सासरी व बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अजित पवारांच्या मृत्यूची बातमी शरद पवारांना कशी सांगितली?
अजित पवार हे केवळ शरद पवारांचे पुतणे नव्हते, तर त्यांनीच दादांना राजकारणाचे बाळकडू पाजले होते. शरद पवारांचे वय आणि त्यांचे अजित पवारांवरील प्रेम पाहता, त्यांना ही बातमी सांगणे अत्यंत कठीण होते.
सुरुवातीला शरद पवारांना अपघाताची तीव्रता आणि निधनाची बातमी देण्यात आली नव्हती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत केवळ 'छोटा अपघात झाला आहे' असे सांगण्यात आले. त्यांना हा धक्का सहन व्हावा यासाठी आधी त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले.
अश्रूंचा बांध फुटला..!
शरद पवार रुग्णालयातून घरी परतल्यानंतर, घरातील ज्येष्ठ मंडळींनी धीर एकवटून दादांच्या अपघाती निधनाची बातमी दिली. बातमी ऐकताच शरद पवार सुन्न झाले आणि काही क्षण शांत राहून त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या घटनेनंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, भगिनी सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले आहेत. पार्थ पवार, रोहित पवार आणि प्रतिभा पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंब बारामतीत एकत्र आले असून, संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. बारामतीकरांचा तर अजित पवार परत या अशी आर्त भावना व्यक्त केली जात आहे.
अंत्यसंस्कार आणि ५ महत्त्वाचे अपडेट्स
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी बारामती येथील 'काटेवाडी' येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
राज्य सरकारने अजित पवारांच्या सन्मानार्थ तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.
तपासाचे आदेश
विमान लँडिंगच्या वेळी नक्की काय तांत्रिक बिघाड झाला, याचा उच्चस्तरीय तपास करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.
बीड, बारामतीत बंद
अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर बारामती, बीड आणि पवार कुटुंबाच्या नातेवाईकांच्या गावांमध्ये गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला आहे.
नेत्यांची गर्दी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील अनेक बडे नेते अंत्यदर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले आहेत. तर देशातील दिग्गज नेत्यांनीही उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.












Click it and Unblock the Notifications