एकनाथ शिंदे, केसरकर आणि लोढांना मंत्रिमंडळात घेऊ नका.. आदित्य ठाकरेंनी केला 'हा' मोठा आरोप
Aditya Thackeray's press conference- खोके सरकारने मोठा घोटाळा केला आहे. मुंबईतील रस्ता घोटाळ्यांची एसआयटी चौकशी लावा, अशी मागणी मुंबई भाजप करत आहेत. हीच मागणी आम्हीही करत होतो. त्यामुळे ही चौकशी झाल्याशिवाय एकनाथ शिंदे, दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका, अशी मागणी आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदीत्य ठाकरे यांनी केली. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपसह शिंदे गटावर घोटाळ्यांचे आरोप केले.

आदित्य ठाकरेंचे आरोप
आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. ते म्हणाले, मुंबईतील रस्ता कामांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आता मुंबई भाजप करत आहे. मात्र ही मागणी आम्ही अनेक दिवसांपासून करत आलो आहे. खोके सरकारने त्यांच्या काळात मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. आता मुंबई भाजपचे डोळे उघडलेत. मात्र खोके सरकारने त्यांचा व ठेकेदारांचा खिशा भरलाय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
फडणवीसांना दिला सल्ला
आदित्य ठाकरे म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस सरकार आले आहे. त्यांना स्वच्छ सरकार चालविण्याची मोठी संधी आहे. त्यांना खरोखर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी या रस्ता कामांची चौकशी करावी. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे, दीपक केसरकर व मंगलप्रभात लोढा मंत्रिमंडळात स्थान देऊ नये. त्यांचा किंवा त्यांच्या बगलबच्चा ठेकेदारांचा या रस्ता घोटाळ्यात हात नाही, हे आता सरकारनेच सिद्ध करावे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
हिंदूत्वाच्या मुद्यावरही टोला
आदित्य ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देखील भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजपचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे. भाजपच हेच बेगडी हिंदूत्व उद्धव ठाकरेंनी समोर आणलं आहे. भाजपशासित राज्यातच हिंदुत्व धोक्यात आहे. दादरमधील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मारूतीच्या मंदिराला नोटीस देण्यात आली. त्या विरोधात त्यांच्याच लोकांनी आंदोलन केलं. आता घाईघाईत ही नोटीस स्थगिती करण्यात आली, असा आरोपही ठाकरेंनी केला.












Click it and Unblock the Notifications