भीषण भयावह! बसने 2 कारला चिरडले; 2 चिमुकल्यांसह 9 जण ठार, मृतांत ख्रिसमससाठी घरी जाणाऱ्यांचा समावेश

Tamil Nadu Road Accident 9 Killed : ख्रिसमसच्या आदल्या दिवशी तामिळनाडूमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चेन्नई-तिरुचिरापल्ली महामार्गावर एका सरकारी बसचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कारना जोरदार धडक दिली. मृतांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी चेन्नईहून आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचा समावेश असल्याचे समजते.

Tamil Nadu Road Accident 9 Killed

दरम्यान या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

अपघाताचे कारण काय?

तिरुचिरापल्लीहून चेन्नईकडे जाणाऱ्या 'एसईटीसी' बसचा पुढचा टायर अचानक फुटला, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला आली. विरुद्ध दिशेने येताच या बसने दोन कारला धडक दिली. हा भीषण अपघात २४ डिसेंबरला रात्री घडला.

हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेत दोन कारमधील ५ पुरुष आणि ४ महिलांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. याच अपघातात २ मुलांसह ४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी व्यक्त केले दुःख

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "आज संध्याकाळी (२४ डिसेंबर रोजी) ७.३० वाजताच्या सुमारास कुड्डालोर जिल्हा येथील तिट्टाकुडी सर्कलमधील एजथुर गावाजवळ झालेल्या अपघातात दोन्ही कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच पुरुष आणि चार महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी ऐकून मला खूप धक्का बसला. त्रिचीहून चेन्नईला जाणाऱ्या अरागप बसचा पुढचा टायर अचानक फुटला, ज्यामुळे बसने नियंत्रण गमावले आणि रोडब्लॉक ओलांडताना विरुद्ध रस्त्यावरून जाणाऱ्या दोन कारना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन मुलांसह चार जणांवर विशेष उपचार करण्याचे आदेश मी दिले आहेत."

मृतांच्या कुटुंबियांना ३ लाख, गंभीर जखमींना १ लाखांची मदत

स्टॅलीन यांनी पुढे म्हटले की, "अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मी माझ्या मनापासून शोक आणि संवेदना व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत."

हेही वाचा : काळाचा घाला! आंध्रप्रदेशात बस दरीत कोसळून भीषण अपघात! 9 भाविकांचा मृत्यू, कसा घडला अपघात? वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+