सोनम रघुवंशीचा 'बॉयफ्रेंड' राज कुशवाह कोण आहे?, त्यांची भेट कशी झाली, अनेक गुपित उलघडली?
who is Sonam Raghuvanshi Boy Friend raj kushwaha : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.
राजा रघुवंशी यांची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यावर मेघालयात हनिमून दरम्यान तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनम रघुवंशीला सोमवारी, 9 जून रोजी सकाळी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यातून अटक करण्यात आली आहे.
आता असे सांगितले जात आहे की, सोनमचे राज कुशवाह नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. नेमका राज कुशवाह कोण आहे, त्याने खरच सोनम रघुवंशींला तिच्या पतीची हत्या करण्यात मदत केली का, यासह अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

पोलिसांना सोनमसह राज कुशवाहवर संशय!
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने तिचा कथित 'बॉयफ्रेंड' राज कुशवाहामुळे तिच्या पती राजाची हत्या करून घेतली.
दुसरीकडे, सोनमचे वडील देवी सिंह यांनी माध्यमांना सांगितले आहे की, ते राज नावाच्या मुलाला ओळखतात... तो त्याच्यासोबत काम करतो..पण हाच राज कुशवाह आहे की नाही याची त्यांना खात्री नाही, अशा परिस्थितीत, हा राज कुशवाह कोण आहे आणि तो सोनमला कसा भेटला, याविषयी आपण जाणून घेणार आहोत..!
हे ही वाचा : सोनम रघुवंशीने तिचा पती 'राजा'ची हत्या का केली?, प्रेमप्रकरण की अन्य.., कॉन्ट्रॅक्ट किलर कोण होता?
- राजा रघुवंशीच्या भावाने विपुल रघुवंशीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, राज कुशवाहा हा सोनम रघुवंशीचा कर्मचारी होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून तिच्या पतीला मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता. तथापि, याबद्दल अधिक माहिती नाही, किंवा पोलिसांनी देखील स्पष्ट केलेले नाही. परंतु, काही मीडियानुसार ही माहिती वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.
🔴 सोनमचे लग्नापूर्वी राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते. राज कुशवाहा सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान असल्याचे सांगितले जाते. काही वृत्तांमध्ये असा दावा केला आहे की, सोनमचे वडील देवी सिंह यांचा इंदूरमध्ये एक छोटा प्लायवूड कारखाना आहे, राज कुशवाहा तिथे काम करायचा.
🔴 सोनम अनेकदा तिच्या वडिलांच्या कारखान्यात जात असे आणि ती येथूनच राज कुशवाहची तिची ओळख झाली. येथूनच दोघांमधील प्रेम प्रकरण सुरू झाले.
- शिलाँगमध्ये इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी राज कुशवाहा हा संशयित आहे. आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये राज कुशवाहा देखील आहे.
- याशिवाय, विशाल चौहानला इंदूर येथून अटक करण्यात आली आहे, तर आकाश राजपूतला इंदूरजवळून आणि आनंद कुर्मीला बिना येथील बसरी गावातून अटक करण्यात आली आहे. ही माहिती अतिरिक्त डीसीपी गुन्हे शाखा राजेश दंडोटिया यांनी इंदूर येथे दिली आहे.
हे ही वाचा : Meghalaya couple: हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येचा छडा लागला, पत्नी sonamने केले कांड!
राज कुशवाह आणि सोनमबद्दल भाऊ विपुल काय म्हणाला?
मृत राजा रघुवंशीचा भाऊ विपुल रघुवंशी म्हणाले, "मला त्या 3-4 लोकांची नावे कळेपर्यंत त्यांची माहिती नव्हती... राज कुशवाहाचे नाव समोर आले आहे, याचा अर्थ सोनमचा हत्येत हात असू शकतो.
राज कुशवाह सोनमचा कर्मचारी होता. ते सतत फोनवर बोलत असत." तथापि, त्यांनी सांगितले की सोनम रघुवंशी राजाला मारेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. ते म्हणाले की, जेव्हा त्यांचे लग्न ठरले तेव्हा दोघेही आनंदी होते.
आम्हाला कधीच वाटले नव्हते की सोनम असे काही करेल... मेघालय सरकार इतरांच्या सहभागाबद्दल खोटे बोलत नाही... मी आतापर्यंत राज कुशवाहाला कधीही पाहिले नाही, मी फक्त त्याचे नाव ऐकले आहे.
सोनम यात सहभागी असू शकते... त्यांना फक्त माँ कामाख्या मंदिरात पूजा करण्यासाठी आसामला जावे लागले. त्यानंतर, त्यांनी सांगितले की ते शिलाँगला जात आहेत. आम्हाला माहित नाही की दोघांपैकी कोणी मेघालयाच्या सहलीचे नियोजन केले होते. त्यांनी परतीचे कोणतेही तिकीट बुक केले नव्हते."












Click it and Unblock the Notifications