Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Meghalaya couple: हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्येचा छडा लागला, पत्नी sonamने केले कांड!

Meghalaya honeymoon Indore, raja sonam case : मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशीच्या हत्येचा उलघडा झाला आहे. पत्नी सोनम रघुवंशीनेच तिघांच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली.

दुसरीकडे, सोनम रघुवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या तीन हल्लेखोरांनाही अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोर मध्य प्रदेशातील आहेत. एका आरोपीचा शोध सुरू आहे.

meghalaya couple

नेमकं काय घडलं होत?

मध्य प्रदेशातील इंदूरहून हनिमूनला मेघालयला गेलेल्या नवविवाहित राजा रघुवंशी यांच्या हत्येचे गूढ आता उकलले आहे. परंतु, त्यामागील सत्य अतिशय धक्कादायक आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या लग्नाला काही दिवस झाले होते. 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झाले, 20 मे रोजी नवविवाहित जोडपे मेघालयाच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये त्यांच्या हनिमूनसाठी निघाले, परंतु 23 मे रोजी सर्व काही बदलले होते. त्यानंतर सोनम रघुवंशी देखील फरार झाली होती. तिचाही शोध घेतला जात होता. परंतु, आज सोमवारी दि.9 रोजी या घटनेचा उलघडा झाला आहे.

सोनमने आत्मसमर्पण केले

मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही या प्रकरणाबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, इंदूर येथील राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, सोनमने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे.

मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनीही या प्रकरणात माध्यमांशी बोलताना सांगितले की, इंदौरमधील व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनमला कोणतीही दुखापत झालेली नाही. ती पूर्णपणे ठीक आहे. सध्या पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले आहे.

राजा रघुवंशी खून प्रकरण, कसे घडले हत्याकांड?

  • राजा रघुवंशी (वय-29) आणि सोनम रघुवंशी यांचे 11 मे 2025 रोजी इंदूर येथे लग्न झाले होते. 20 मे रोजी हे नवविवाहित जोडपे मेघालयातील शिलाँगला हनिमूनसाठी निघाले होते.
  • 23 मे रोजी ते नोंगरियाट गावातील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी गेले होते, त्यानंतर ते बेपत्ता झाले. 24 मे रोजी सोहराईममध्ये त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटी बेवारस आढळली.
  • 2 जून रोजी सोहरातील वेइसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीतून राजा सूर्यवंशीचा मृतदेह सापडला आणि पोस्टमार्टममध्ये हत्येची पुष्टी झाली.
  • दरम्यान, सोनम बेपत्ता झाल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचा संशय होता आणि काही सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की तिला बांगलादेशला नेण्यात आले असावे. परंतु, गाजीपूरमध्ये ती सापडल्याची आणि आत्मसमर्पण केल्याच्या बातमीने बांगलादेशला नेल्याचा चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.

सोनमची प्रकृती आणि कुटुंबाचा दावा

दुसरीकडे, सोनमचे वडील देवी सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सोनमची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नाही. ते म्हणाले की, "सोनम घाबरली आहे आणि तिला काहीही आठवत नाही असे वारंवार म्हणत आहे. तिचे काय झाले हे आम्हाला माहित नाही. आम्हाला तिला इंदूरला आणायचे आहे आणि तिची वैद्यकीय तपासणी करावी अशी आमची इच्छा आहे.

देवी सिंग यांनी यापूर्वी मेघालय पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता, परंतु आता त्यांनी तपासात त्यांच्या सहकार्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शिलाँगमध्ये तिला शोधत असलेल्या सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी म्हणाले, "मला रात्री फोन आला की सोनम गाजीपूरमध्ये आहे. मी ताबडतोब माझ्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवले. सोनमची प्रकृती पाहून असे वाटले की तिला खूप त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला सत्य काय घडलं ते समोर आणायचे आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने आणि रघुवंशी समाजाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राजाचे भाऊ सचिन रघुवंशी म्हणाले, सोनमची अचानक गाजीपूरमध्ये उपस्थिती आणि हत्येच्या कटाचा आरोप धक्कादायक आहे. मेघालय पोलिसांच्या तपासावर आम्हाला विश्वास नाही. संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी झाली पाहिजे.

इंदूरमध्ये राजाच्या अंत्यसंस्कारादरम्यान (5 जून 2025), रघुवंशी समाजाने बाईक रॅली काढली आणि सीबीआय चौकशीची मागणी केली.

दुसरीकडे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 7 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्याशी बोलून सीबीआय चौकशीची शिफारस केली. यादव यांनी एक्स वर लिहिले, "मध्य प्रदेश सरकार सोनम रघुवंशीच्या कुटुंबासोबत उभे आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+