आजपासून रेल्वेचे तिकीट दर वाढले! कोणत्या गाड्यांसाठी भाडेवाढ झाली, तुमच्या खिशाला किती झळ बसणार?वाचा
Railway ticket price hike : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आज १ जुलै २०२५पासून थोडीफार झळ बसणार आहे. रेल्वेने आपल्या तिकीट दरात वाढ केली आहे. आता या वाढीचा आपल्या खिशाला किती फटका बसणार याची माहीत जाणून घेण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत.
दिलासादायक बाब हि आहे की, स्थानिक प्रवासापेक्षा रेल्वेने जी भाडेवाढ केली ती लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहे आणि हे दर पुर्वीच्या तुलनेत महाग ठरणार आहेत. एसीचा तिकीट दर तुलनेत वाढला आहे. रेल्वेने कोणत्या श्रेणीत किती दर वाढ झाली हे आज आपण जाणून घेऊया.

आजपासून भाडेवाढ किती अन् कोणत्या प्रवासासाठी
रेल्वेच्या माहितीनुसार, लवकरच नवीन भाडेवाढीसंदर्भात माहिती रेल्वेस्थानकावर दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षानंतर ही पहिली भाडेवाढ आहे, रेल्वेने भाडे वाढवताना प्रवाशांना फार झळ बसणार नाही याची काळजी घेतली आहे.
- रेल्वेमंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार, पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी तिकीट दरात वाढ झाली आहे.
- जनरल, स्लीपर, प्रथमश्रेणी आणि एसी श्रेणीत तिकीट दर वाढ झाली आहे. एसी चेअरक्लास, एसी थ्री टियर, एसी टु टियर, थ्री इकानाॅमी, एसी फर्स्ट क्लास आणि एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी प्रती किलोमीटर दोन पैसे तिकीट दर वाढले आहेत.
- नाॅन एसी रेल्वेच्या तिकीटदरात प्रती किलोमीटर एक पैशांची वाढ झाली आहे.
या गाड्यांचे तिकीट दर वाढले
शताब्दी, राजधानी, जनशताब्दी, तेजस, दुरंतो, वंदेभारत, हमसफर, अमृत भारत, महामना, गतीमान, अंत्योोदय, गरीब रथ, युवा एक्स्प्रेस, अनुभुती कोच आणि एसी विस्टाडोम या ट्रेनचे तिकीट दर वाढले आहेत. या ट्रेनच्या मुळ भाड्यात पाचशे किलोमीटरनंतर प्रति किलोमीटर दोन पैशांची वाढ झाली आहे.
रेल्वेने स्पष्ट केले की, वरील रेल्वेमध्ये आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज आणि जीएसटीमध्ये काहीही बदल झालेला नाही. किरायाही पुर्ण नियमानुसार, राऊंडिग ऑफमध्येच म्हणजे जर सात रुपये दहा पैशांच्या जागी आठ रुपये घेतला जाणार.
या प्रवाशांना दिलासा..
- लोकल ट्रेन आणि एमएसटी धारकांना या भाडेवाढीतून दिलासा मिळाला आहे. या प्रवासाची तिकीटे पुर्वीइतकीच राहणार आहे. म्हणजेच उपनगरातील रेल्वे सेवेच्या तिकीट दरात कोणताही बदल झालेला नाही.
- यासह रेल्वेने हेही स्पष्ट केले की, मासिक पाससाठी कोणतीही भाडेवाढ झालेली नाही. जे भाडे आधी आहे तेच भाडे मासिक पाससाठी राहणार आहे.
हेही वाचा : रेल्वेची नवी रिझर्व्हेशन बुकींग प्रणाली कशी असेल? दीड मिनिटांत चक्क दीड लाख तिकीटं, फायदे जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications