रेल्वेची नवी रिझर्व्हेशन बुकींग प्रणाली कशी असेल? दीड मिनिटांत चक्क दीड लाख तिकीटं, फायदे जाणून घ्या
Railway PRS : भारतीय रेल्वे संपूर्ण प्रवास अनुभव प्रवासी-केंद्रित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.प्रवाशांच्या सोईसाठी विविध योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन आणखी सेवा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. कोणत्याही प्रवाशाच्या प्रवासाची सुरुवात तिकीट काढणे ते तिकीट आरक्षणाच्या टप्प्यापासून सुरू होतो. तिकीट बुकिंग सोपे करण्यासाठी रेल्वेने रेल्वेची नवी रिझर्व्हेशन बुकींग प्रणाली आणली आहे. यासह रेल्वे प्रशासन काही महत्वाची पावले उचलत आहेत.

काय आहे रेल्वेची रेल्वेची नवी रिझर्व्हेशन बुकींग प्रणाली?
- भारतीय रेल्वे या वर्षाच्या अखेरपर्यंत नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली आणत आहे.ही नवी प्रणाली प्रति मिनिट दीड लाखांहून अधिक रेल्वे तिकिटे जारी करण्यास सक्षम असणार आहे.
- रेल्वेची नवी रिझर्व्हेशन बुकींग प्रणालीत जारी होणाऱ्या तिकीटांची संख्या सध्या ३२ हजार तिकिटांच्या क्षमतेच्या जवळजवळ पाच पट असेल.
- विशेष म्हणजे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयी आणि स्मार्ट तिकिटिंगवर लक्ष केंद्रित करत असून प्रवासी आरक्षण प्रणाली तुमच्या भाषेत राहील.
- प्रवासाची अनिश्चितता कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय लवकरच प्रतीक्षा यादीतील तिकिटांचे आगाऊ चार्टिंग लागू करेल. दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी आदल्या दिवशी रात्री ९ वाजेपर्यंत चार्ट तयार केले जातील.
- सुरक्षा आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी तत्काळ बुकिंगमध्ये आधार किंवा सरकारी आयडीद्वारे डिजीलॉकरशी जोडलेले व्यापक प्रमाणीकरण असेल.
- नवीन पीआरएस प्रणाली तिकीट चौकशी क्षमता दहापट वाढवेल - प्रति मिनिट ४ लाखांवरून ४० लाखांपर्यंत.
आठ तास आधी जाहीर होणार रेल्वे आरक्षण चार्ट
सध्या, रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जातात. यामुळे प्रवाशांच्या मनात अनिश्चितता निर्माण होते. जवळच्या भागातून प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी येतात तेव्हा ही अनिश्चितता गंभीर समस्या निर्माण करू शकते.ही अनिश्चितता दूर करण्यासाठी, रेल्वे बोर्डाने सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दोन वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशीच रात्री नऊ वाजता तयार केला जाईल. रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आणि बोर्डाला टप्प्याटप्प्याने ते अंमलात आणण्याचे निर्देश दिले जेणेकरून कोणताही व्यत्यय येणार नाही.
यामुळे प्रवाशांचा काय फायदा होणार?
रेल्वे आरक्षण चार्ट आठ तास आधी जाहीर होणार असल्याने प्रतीक्षा यादीतील तिकिट असलेल्या प्रवाशांसाठी अनिश्चितता कमी होईल. प्रवाशांना प्रतीक्षा यादीच्या स्थितीबद्दल आधीच माहिती मिळेल. यामुळे दूरच्या ठिकाणांहून किंवा प्रमुख शहरांच्या उपनगरांमधून लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. प्रतीक्षा यादी निश्चित न झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळेल.
काय आहे आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS)
- पीआयबीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवासी आरक्षण प्रणालीच्या अपग्रेडेशनचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यांपासून CRIS (रेल्वे माहिती प्रणाली केंद्र) द्वारे हा प्रकल्प राबविला जात आहे.
- नवीन पीआरएसमध्ये, वापरकर्ते त्यांच्या पसंतीची सीट निवडू शकतील आणि भाडे पाहू शकतील. त्यात दिव्यांगजन, विद्यार्थी, रुग्ण इत्यादींसाठी एकात्मिक सुविधा देखील आहेत.
- "तत्काळ बुकिंग" साठी सुव्यवस्थित प्रमाणीकरण - भारतीय रेल्वे १ जुलै २०२५ पासून फक्त सत्यापित वापरकर्त्यांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाइल APP वर "तत्काळ तिकिटे बुक" करण्याची परवानगी देईल.
- याव्यतिरिक्त, जुलै २०२५ च्या अखेरीस तत्काळ बुकिंगसाठी ओटीपी-आधारित पडताळणी लागू केली जाईल.
- रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ बुकिंगसाठी प्रमाणीकरण यंत्रणा व्यापक करण्याचे निर्देश दिले. हे प्रमाणीकरण वापरकर्त्याच्या डिजीलॉकर खात्यात उपलब्ध असलेल्या आधार किंवा इतर कोणत्याही पडताळणीयोग्य सरकारी ओळखपत्राचा वापर करून केले पाहिजे.
- हे उपक्रम भारतीय रेल्वेच्या प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि त्यांना अधिक नागरिक अनुकूल बनवण्यासाठी सतत प्रयत्नांचे प्रतिबिंबित करतात.












Click it and Unblock the Notifications