"अमित शहा माफी मागा!" प्रियंका गांधींसह इंडिया आघाडीचे आंदोलन, वाचा संसदेत आज काय घडले?
Priyanka Gandhi Vadra joins INDIA Alliance MPs' protest : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी इंडीया आघाडीच्या खासदारांसह निषेध आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अमित शहा यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली.
दोन्ही सभागृहात गदारोळ
आज 20 डिसेंबर 2024 हा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. धक्काबुक्की प्रकरणावरून आज संसदेत गदारोळ झाला. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानी मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत निषेध केला.

लोकसभेत आणि राज्यसभेत संविधानावर चर्चा सुरू झाल्याचं निश्चित झाल्यावर हा गोंधळ मिटलेला दिसला. त्याच वेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भीमराव आंबेडकरांवर केलेल्या टिप्पणीवरून 19 डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनानंतर आजही सकाळी आंदोलन झाले.
हेही वाचा : संसदेत धक्काकांड! भाजप खासदार सारंगींचे डोकं फुटलं! राहुल गांधींना धक्काबुक्की, म्हणाले ते अडवत होते
गदारोळाने लोकसभेचे कामकाज सुरु
लोकसभेचे कामकाज गदारोळाने सुरू झाले. राहुल गांधींविरुद्धच्या एफआयआरवर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, "संपूर्ण देश पाहत आहे, त्यांनी राहुल गांधींवर अनेक खटले दाखल केले आहेत. ते नवीन एफआयआर टाकतात आणि खोटे बोलतात... हे त्यांच्या निराशेची पातळी दर्शवते."
#WATCH | Delhi: Rajya Sabha LoP Mallikarjun Kharge, Congress MP Priyanka Gandhi Vadra and other INDIA Alliance MPs' protest over Union Home Minister Amit Shah's remark on Dr BR Ambedkar in Rajya Sabha. They are demanding his apology and resignation.
— ANI (@ANI) December 20, 2024
Visuals as the march from… pic.twitter.com/M0OumpDye4
अध्यक्षांची खासदारांना समज
लोकसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी लोकसभा अध्यक्षांनी खासदारांना समज दिली. ते म्हणाले की, संसदेत कोणत्याही प्रकारच्या निषेध निदर्शनास परवानगी नाही. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही प्रचंड गदारोळ सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
हेही वाचा : राज्यसभेत अमित शहा आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?, काँग्रेसने का केली राजीनाम्याची मागणी?, वाचा सविस्तर
दिल्लीत संसदेच्या आवारात निदर्शने
काँग्रेस पक्षाने डॉ. बी.आर. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. 20 डिसेंबर 2024, सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी बीआर आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस खासदार शुक्रवारी सकाळी 10 वाजता संसद भवनाबाहेर निदर्शने सुरु केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
आज 20 डिसेंबर 2024 हा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानी मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत निषेध केला.












Click it and Unblock the Notifications