संसदेत धक्काकांड! भाजप खासदार सारंगींचे डोकं फुटलं! राहुल गांधींना धक्काबुक्की, म्हणाले ते अडवत होते
Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशानात एक मोठे नाट्य घडले आहे. राहुल गांधी आणि भाजप खासदारामध्ये धुमश्चक्री झाली. यात दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली असून यात भाजप खासदाराचे डोके फुटले. मला आत जाण्यापासून अडवून धक्काबुक्की केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे तर राहुल गांधीनीही मला धक्काबुक्की केली असे भाजप खासदाराने म्हटले आहे.
काय म्हणाले भाजपचे ते खासदार
भारतीय जनता पक्षाचे ओडिशातील बालासोर येथील भाजप खासदार प्रताप सिंग सारंगी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला, त्यानंतर तो खासदार माझ्या अंगावर पडला.त्यानंतर मी खाली पडलो. यात माझे डोके फुटले असा आरोप खासदार प्रतापसिंग सारंगी यांनी केलं.

काय म्हणाले राहुल गांधी?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी म्हणाले, 'मला भाजपच्या खासदाराने संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. भाजप खासदाराने मला धक्काबुक्की केली, सर्व काही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.'
हेही वाचा : लोकसभेत 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक सादर; काँग्रेस-सपाने याला हुकूमशाहीचे पाऊल म्हटले
भाजप खासदाराने धमक्या दिल्या - राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या खासदारांनी मला धमक्या दिल्या आणि संसदेच्या मुख्य गेट मकरद्वार येथे जमल्यामुळे मला संसदेत खूप अस्वस्थ वाटले. आम्हाला आत जाण्यापासून रोखले जात होते आणि त्याच क्षणी हाणामारी झाली आणि लोक बाहेर गेले.
हेही वाचा : संसदेच्या गेटवर राहुल गांधींनी प्रियंका गांधीना रोखले, नंतर झाले असे की... पहा व्हिडीओ
भाजपच्या लोकांचा संविधानावर हल्ला
भाजप खासदार आम्हाला धक्काबुक्की आणि धमक्या देत आहेत, भाजपचे लोक थेट संविधानावर हल्ला करत आहेत आणि आंबेडकरांचा अपमान करत आहेत असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. त्यानंतर राहुल गांधींनी भाजप खासदारांवर प्रवेशद्वार अडवून आत जाऊ दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही पायऱ्यावर उभे असताना भाजपचे खासदार मला धक्काबुक्की करत धमक्या देत होते असेही गांधी म्हणाले.
#WATCH | Delhi | BJP MP Pratap Chandra Sarangi says, "Rahul Gandhi pushed an MP who fell on me after which I fell down...I was standing near the stairs when Rahul Gandhi came and pushed an MP who then fell on me..." pic.twitter.com/xhn2XOvYt4
— ANI (@ANI) December 19, 2024
हेही वाचा :प्रियंका गांधींच्या हॅण्डबॅगवर पॅलेस्टाईननंतर आज बांगलादेशाचा मुद्दा; वाचा नेमकं काय आहे प्रकरण?
खासदाराला रुग्णालयात दाखल केले
आंदोलनादरम्यान जखमी झालेले भाजप खासदार प्रताप सारंगी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हीलचेअरवर बसलेला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाबाबत भाजप राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल करणार आहे.












Click it and Unblock the Notifications