संसदेच्या गेटवर राहुल गांधींनी प्रियंका गांधीना रोखले, नंतर झाले असे की... पहा व्हिडीओ
काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. नांदेड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या रवींद्र चव्हाण यांनीही आज शपथ घेतली. प्रियांका गांधी वाड्रा या आज शपथविधीसाठी संसदेत काही खासदारांसह येत होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभागृहाच्या दारावरच अडवले. त्यानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

राहुल गांधींनी प्रियंकाला अडवले
शपथविधीसाठी आज प्रियंका गांधी या नूतन तीन खासदरांसह संसदेत आल्या. प्रियांका गांधी वाड्रा संसदेच्या पायऱ्याजवळ येताच राहुल गांधी पुढे आले आणि त्यांनी स्टॉप, स्टॉप असे म्हणत रोखले. राहुल गांधींच्या अचानक पवित्र्यामुळे प्रियांका गांधीसह इतर खासदार थोडावेळ भांबावले. नंतर राहुल गांधी खिशातून स्वतःचा मोबाइल काढून प्रियांका गांधीसह सर्व खासदारांचा फोटो घेतला. त्यानंतर ते सर्व फोटो प्रियांका गांधींना दाखवले आणि नंतर त्या सर्व नूतन खासदारांना घेऊन रुहील गांधी सभागृहात गेले. हा व्हिडीओ आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
#WATCH | Congress leader Priyanka Gandhi Vadra entered the Lok Sabha today, marking the beginning of her journey as the Member of Parliament
— ANI (@ANI) November 28, 2024
(Video source: AICC) pic.twitter.com/tE8jdtSffc
मी, प्रियंका गांधी-वाड्रा, शपथ घेते की....
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 28, 2024
वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज संसदेत खासदार म्हणून शपत घेतली. त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!#INC #Congress #PriyankaGandhi #LokSabha @priyankagandhi @INCIndia pic.twitter.com/fYfhuc0Fdp
रवींद्र चव्हाण यांनी घेतली मराठीत शपथ
नांदेडचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनीही आज शपथ घेतली. नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वडील वसंत चव्हाण यांच्या मृत्यूनंतर याठिकाणाहून निवडणूक लढविली होती. त्यांनाही ५ लाख ८६ हजार ७८८ एवढी मते मिळाली. अवघ्या १४५७ मतांनी त्यांनी भाजपाचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला. आज त्यांनी मराठीत शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधले.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications