धक्कादायक! पहलगाम हल्ल्याचा VIDEO पाहण्यापासून रोखले; तरुणाला मारहाण, रेल्वेतून फेकण्याचा प्रयत्न
Pahalgam terror attack VIDEO prevented from being watched Youth : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा VIDEO पाहण्यापासून एका तरुणाला रोखण्यात आले. ही घटना मध्यप्रदेशातील असून रेल्वेत घडलेल्या या घटनेत तरुणाला मारहाण करण्यात आली. यासह रेल्वेतून या पीडित तरुणाला फेकण्याचा प्रयत्न झाला आहे.
मध्यप्रदेशातील इंदौर येथे ही घटना घडली आहे. भोपाळ - इंदौर पॅसेंजर रेल्वेत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ज्याला मारहाण झाली तो अवघ्या 23 वर्षाचा तरुण आहे.

काय घडला भोपाळ - इंदौर पॅसेंजर रेल्वेत प्रकार?
आजतकने पहलगाम हल्ल्याची रिल्स पाहणाऱ्या तरुणाला रेल्वेत झालेल्या मारहाणीसंदर्भात वृत्त दिले आहे. त्यानुसार, हा 23 वर्षीय तरुण रेल्वेतून प्रवास करत होता. त्यावेळी तो त्याच्या मोबाईलवर पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यासंबंधीत रिल्स पाहत होता.त्यावेळी काही तरुण तेथे आले आणि हे रिल्स पाहू नको असे म्हणाले. तरुणाला रिल्स पाहण्यास मनाई त्यांनी केली पण या तरुणाने आपण रिल्स पाहणार असे म्हटल्यानंतर काही तरुणांनी रिल्स पाहणाऱ्याला मारहाण केली यासह त्याला शिवीगाळ करण्यात आली.
तरुणाला रेल्वेतून फेकण्याचा प्रयत्न
माध्यमांनी वृत्त दिले की, रिल्स पाहणाऱ्या तरुणाला मारहाण तर झालीच पण त्याला रेल्वेतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरुणाच्या तक्रारीवरुन दोन अज्ञातांवर गुन्हा
मारहाण झालेल्या तरुणाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तिंविरोधात मारहाण करुन गंभीर इजा होईल असे कृत्य, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात काही सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.
काय आहे पीडित तरुणाची तक्रार?
पीडित तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटले की, भोपाळ इंदौर पॅसेंजर गाडीत सामान्य डब्ब्यात प्रवास करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याची रिल्स पाहताना ती पाहू नको असे म्हणत विरोध केला आणि वाद घालत मारहाण केली तसेच धमकावत रेल्वेतून फेकण्याचा प्रयत्न केल्याचे तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : रिलमेकर्स व्हिडिओग्राफरने पहलगाम हल्ल्याचा कसा अन् कोणत्या स्थितीत काढला व्हिडिओ? जाणून घ्या
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली! असुदोद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल, वाचा
हेही वाचा : कोण आहे नेहा राठोड, जिने पहलगाम हल्ल्यानंतर मोदींना घेरलंय? पाकने तिचे व्हिडीओ का व्हायरल केलेत?












Click it and Unblock the Notifications