Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कोण आहे नेहा राठोड, जिने पहलगाम हल्ल्यानंतर मोदींना घेरलंय? पाकने तिचे व्हिडीओ का व्हायरल केलेत?

बिहारमधील प्रसिद्ध लोक गायिका नेहा सिंग राठोड सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर नेहाने केंद्र सरकारला असे काही प्रश्न विचारले की, तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. अनेकांनी तिला देशद्रोही म्हटलं मात्र तिनं माघार घेतली नाही. आता तिचा हाच व्हिडीओ पाकिस्तानमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. कित्येक पाकिस्तानी लोकांनी तो चर्चेत ठेवलाय. आता पाकिस्तान तिचा हाच व्हिडीओ भारताविरोधी शस्त्र म्हणून वापर करतंय, अशीही चर्चा होतेय.

Who is Neha Singh Rathore

काय आहे या व्हिडिओमध्ये?

पहलगाम हल्ल्यानंतर नेहा सिंगने एक व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय कठोर शब्दांत तिने हल्लाबोल केला.'जे लोक एका फोन कॉलने दुसऱ्या देशातील युद्ध थांबवू शकतात, ते त्यांच्याच देशातील दहशतवादी हल्ला थांबवू शकले नाहीत, असं तिनं या व्हिडीओत म्हटलं. ती पुढे म्हणते, आंधळे अनुयायी मला सांगत आहेत की राजकारण करू नका. अशा बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. मग मी काय प्रश्न विचारू? अरे, जेव्हा देशाचे राजकारण राष्ट्रवाद आणि हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर चालत असते, तरीही दहशतवादी हल्ल्यांमध्ये देशवासीयांचे बळी जात असतात, तेव्हा मी कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारू? असा सवाल करत तिने एक व्हिडीओ बनवला आहे.

मोदींवर केलेत गंभीर आरोप

नेहाने पहलगाम हल्ला बिहार निवडणुकीत मतांसाठी वापरला जाईल, असा संशयही व्यक्त केलाय. नेहा म्हणते, 'मोदीजींच्या सरकारमध्ये दहशतवादी हल्ले झाले, तर मोहम्मद अली जिना आणि नेहरूजींना प्रश्न विचारावेत का?' पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या मृत्यूवर निर्लज्जपणे मते मागणारा हा माणूस पहलगामच्या पर्यटकांच्या मृत्यूवरही मते मागेल. अंध अनुयायीही त्याला मास्टर स्ट्रोक म्हणत मतदान करतील. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल काही रडताना दिसतील आणि बिहार निवडणुकीचा पाया रचताना दिसतील. अंधभक्त बिहार निवडणुकीत ढोंगीजी रडतानाचे रील शेअर करताना दिसतील, असे तिने या व्हिडीओत सांगितले आहे.

विधानांवर नेहा ठाम

या व्हिडीओनंतर नेहाला चांगलेच ट्रोल करण्यात आले. अनेक टिव्ही चॅनल्सने तिच्या मुलाखती घेतल्या. मात्र ती आपल्या विधानावर ठाम राहिली. काहींनी तिला देशद्रोही म्हटल्यावर ती चांगलीच भडकली. नेहाने सोशल मीडियावरही हा राग काढला. नेहा सिंग राठोड पाकिस्तानच्या हातात खेळत आहे का? असा सवाल तिच्यावर विचारण्यात आल्यावर तिने लिहिले की, 'संपूर्ण वृत्तवाहिनीमध्ये असा एकही पत्रकार नाही का ज्याला सरकार, पंतप्रधान आणि देश यांच्यातील फरक माहित आहे?' सरकारला प्रश्न विचारणे हे देशद्रोह कधीपासून झाले? मी गोडी वाहिन्यांना चापलूस आणि खुशामत करणारे म्हणेन, जोपर्यंत हे चॅनेल सरकारची खुशामत करणे थांबवत नाहीत आणि प्रश्न विचारायला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत मी हे सांगत राहीन.

नेहाचे व्हिडीओ पाकमध्ये व्हायरल

नेहाचा हा व्हिडिओ भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये जास्त व्हायरल होत आहे. पाकिस्तानी माध्यमांसोबतच तेथील राजकारणी देखील या व्हिडिओचा शस्त्र म्हणून वापर करून मोदी सरकारला या हल्ल्यासाठी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातही नेहाच्या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, गायिका तिच्या विधानांवर ठाम आहे. ती म्हणते की ती कोणत्याही भीतीशिवाय सरकारला प्रश्न विचारत राहील. पाकिस्तानी माध्यमांनी नेहा सिंग राठोडचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, 'या भारतीय मुलीने बेलगाम हल्ल्यांमागील सत्य आणि कारण उघड केले आहे.' ते म्हणाले की, बिहार निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोदी सरकार हल्ल्यांचा वापर करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+