Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहलगाम हल्ल्यानंतर शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्ध गरळ ओकली! असुदोद्दीन ओवैसींनी सुनावले खडे बोल, वाचा

Asaduddin Owaisi responded to Shahid Afridi's statement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता केवळ पाकिस्तानसोबतच नाही तर तेथील जनतेसोबतही भारतीय जनतेचे आणि राजकारणी खेळाडूंशी संबंध दुरावले आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि एकेकळचा पाकिस्तानी संघाचा बेभरवशी फलंदाज शाहीद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यानंतर गरळ ओकली आहे. या हल्ल्यावर आता भारतातून चोख प्रत्युत्तर त्याला मिळाले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर शाहीद आफ्रिदीने अपेक्षेप्रमाणे टीकात्मक वक्तव्य केले. त्याला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असुदोद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर देत जोकर म्हटले आहे.

Asaduddin Owaisi

भारतात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केले जात आहे. एकीकडे भारतासाठी जगाची सहानुभूती समोर आली आहे. जगातील कित्येक मात्तब्बर व्यक्तींनी भारतासोबत असल्याचे म्हटले आहे पण पाकिस्तानी खेळाडूंनी या हल्ल्याकडे तटस्थ भुमिकेतून बघण्याची अपेक्षा होती, मृतांबद्दल श्रद्धांजली अर्पण करतील असे वाटत असतानाच उलट गरळ ओकण्याचे काम आफ्रिदीने केले आहे.

काय म्हणाला शाहीद आफ्रिदी?

शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी न्यूज मीडियाशी बोलताना वक्तव्य केले होते की, "भारतात एखादा फटाका जरी फुटतो तर ते याचा दोष पाकिस्तामवर लावतात. काश्मीरमध्ये जवळपास आठ लाख सैनिक आहेत, तरीही पहलगाम हल्ला झाला म्हणजे याचा अर्थ हे सर्व बेकार आहेत. लोकांची सुरक्षा करण्यास सैन्य सक्षम नाही"

Take a Poll

शाहीद आफ्रीदीने हेही म्हटले की, हे आश्चर्यजनक आहे की, हल्ल्याच्या एक तासानंतर भारताचा मीडिया बाॅलीवूडमध्ये बदलला. हे देवा प्रत्येक गोष्ट बाॅलीवूडमध्ये बदलू नका. भारतीय मीडियाचे विचार बघा ते स्वःतला शिक्षित समजतात. दोन क्रिकेटर आहेत ज्यांनी भारतासाठी चांगला खेळ केला ते मोठे क्रिकेटर आहेत पण ते पाकिस्तानला दोषी ठरवत आहेत.

काय म्हणाले असुदोद्दीन ओवैसी?

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुदोद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी माजी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीचा समाचार घेतला. ते म्हणाले, त्या जोकरचे नाव नका घेऊ.. एवढे बोलून त्यांनी आफ्रिदीचा विषय संपवला आणि त्याच्यावर ताशेऱे ओढले.

आमच्या आई-बहिणींना मारता तो दहशतवाद नाही का?

ओवैसी यांनी यावेळी पाकिस्तानी पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांचा समाचार घेतला. ते म्हणाले जेव्हा बिलावल यांची आई बेनझीर भुत्तो यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला त्याला पाकिस्तान दहशतवाद म्हणतो आणि आमच्या आई-बहिणींना मारुन टाकले जाते मग हा दहशतवाद नाही का? असा सवाल त्यांनी पाकिस्तान आणि बिलावल भुत्तो यांना विचारला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+