NEET 2025 Exam 2025 : 'नीट' परिक्षेच्या आदल्या दिवशी अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्या!
NEET 2025 exam 2025 Minor student commits suicide : राजस्थानच्या कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे ही घटना NEET परीक्षेच्या आदल्या रात्री घडली. घरातील खोलीत विद्यार्थिनीने गळफास लावून ही आत्महत्या केली आहे.

कोटा येथे राहायची मुलगी
प्राप्त माहितीनुसार, संबंधित विद्यार्थीनी गेल्या अनेक वर्षांपासून कोटा येथे पालकांसोबत राहत होती. ती तेथीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. एनआयएनुसार, एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.
Rajasthan | A minor girl, who was preparing for the NEET exam, has died by suicide in Kota. The student hanged herself the night before NEET exam. Police are gathering information to find out the reasons behind the suicide: Arvind Bhardwaj, SHO
— ANI (@ANI) May 4, 2025
मुलगी मध्यप्रदेशची रहिवासी
रविवारी होणाऱ्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी पार्श्वनाथ परिसरात एका नीटच्या इच्छुक विद्यार्थिनीने तिच्या खोलीच्या लोखंडी ग्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले असे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव उघड करण्यास नकार देताना माध्यमांना सांगितले की, ही मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची होती आणि मध्य प्रदेशातील शेओपूरची रहिवासी होती.
हेही वाचा : न JEE, NEET च्या विद्यार्थ्यांबाबत CBSE चा मोठा निर्णय; 'त्या' विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही
आत्महत्या केलेली विद्यार्थीनी बारावीनंतर नीट परिक्षेची तयारी करत होती, कोटामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये ती नीट-यूजीची तयारी करत होती शनिवारी संध्याकाळी या विद्यार्थीनीने तिच्या खोलीतील लोखंडी ग्रिलला गळफास घेतला. ही बाब ज्यावेळी समोर आली तेव्हा तिचे नातेवाईकांनी धावाधाव केली. दरम्यान तिने आत्महत्या केल्याचे पुढे आले. हा प्रकार शनीवारी रात्री नऊच्या सुमारास पुढे आला ज्यात मुलगी तिला मृतावस्थेत आढळली. या घटनेनंतर तिची वैद्यकीय चाचणी इतर प्रक्रीया सुरु आहेत.
हेही वाचा : नीट परीक्षेचा संपूर्ण निकाल ऑनलाइन जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे 'एनटीए'ला आदेश
कोटामधील 14 वी घटना
विद्यार्थ्यांची आत्महत्या ही गंभीर समस्या असून अभ्यासाचा तणाव आणि ताण यातून काही आत्महत्या झाल्या आहेत. आकडेवारीनुसार, जानेवारीपासून कोटा येथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची ही 14 वी घटना आहे.
Neet 2025 exam आज नीट 2025 परीक्षा
- नीट 2025 ही एमबीबीएस, बीडीएस, बीएससी नर्सिंग आणि आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची परीक्षा आहे.
- राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) ही परिक्षा आयोजित करते.
- आज रविवारी 4 मे 2025रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नीटची परीक्षा होत आहे.
- नीट परीक्षा भारत आणि परदेशातील 566 शहरांमध्ये होत आहे.












Click it and Unblock the Notifications