Krishna Janmashtami 2025 : घरच्या घरीच बनवा जन्माष्टमीसाठी स्वादिष्ट मथुरेचे पेढे; रेसिपी जाणून घ्या
Krishna Janmashtami 2025 Mathura Pedha Special Recipe : श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साऱ्या भारतात साजरा होणार मोठा उत्सव, या दिवशी कृ्ष्णजन्म साजरा होतो तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी होते. जन्माष्टमीच्या या पवित्र सणाला भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी पेढे सर्वात खास मानले जातात. मथुरेचे पेढे जगभरात प्रसिद्ध आहेत, पण जर तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल, तर काळजी करू नका! प्रसिद्ध यूट्यूबर पूनम देवनानी यांनी मावा न वापरता, अगदी सोप्या पद्धतीने हे पेढे बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे.
ही रेसिपी इतकी सोपी आहे की, कोणताही अनुभव नसलेला व्यक्तीही ते बनवू शकेल आणि याची चव अगदी मथुरेत मिळणाऱ्या पेढ्यांसारखीच असते.

मथुरेचे पेढे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- १ मोठा चमचा तूप
- २ कप मिल्क पावडर
- १/२ कप दूध
- ४ हिरव्या वेलची
- १ मोठी वेलची
- १/४ चमचा जायफळ
- १/२ कप पिठीसाखर
मथुरेचे पेढे बनवण्याची सोपी पद्धत: (Krishna Janmashtami 2025 Mathura Pedha Special Recipe)
१. मिल्क पावडर भाजून घेणे:
सर्वात आधी एका जाड कढईत तूप आणि मिल्क पावडर एकत्र करून मंद आचेवर भाजा. सुरुवातीला साधारण ५ मिनिटांपर्यंत मिल्क पावडर भाजत नसल्यासारखे वाटेल, पण हळूहळू त्याचा रंग बदलू लागेल. सुमारे १२-१५ मिनिटांत मिल्क पावडर सोनेरी आणि सुवासिक होईल.
२. दूध आणि मसाले मिसळणे:
मिल्क पावडर व्यवस्थित भाजल्यावर गॅस मंद करून त्यात दूध टाका आणि चांगले मिसळा. आता यात हिरव्या आणि मोठ्या वेलचीचे दाणे तसेच जायफळाची पूड घाला. मिश्रण चांगले एकत्र झाल्यावर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवा.
३. पेढे तयार करणे:
मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण हातावर घेऊन हलके दाब देऊन पेढ्याचा आकार द्या. दोन्ही तळहातांवर गोल फिरवून त्याला मथुरेच्या पेढ्यांसारखा आकार द्या.
हेही वाचा : Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्ठमी कधी आहे 15 की 16 ऑगस्टला? जाणून घ्या तारीख
महत्त्वाच्या टिप्स:
- संपूर्ण प्रक्रिया मंद आचेवर करा जेणेकरून मिश्रण करपणार नाही.
- वेलची आणि जायफळामुळे पेढ्यांना खास चव येते.
- मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच त्यात साखर घाला, यामुळे पेढे चांगले जमतात.
- या सोप्या रेसिपीमुळे तुम्हीही जन्माष्टमीचा सण अधिक खास करू शकता.












Click it and Unblock the Notifications