Krishna Janmashtami 2025 : श्रीकृष्ण जन्माष्ठमी कधी आहे 15 की 16 ऑगस्टला? जाणून घ्या तारीख
Krishna Janmashtami 2025 : दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, यंदा जन्माष्टमीच्या तारखेबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोकांच्या मते हा उत्सव 15 ऑगस्टला आहे, तर काहींच्या मते तो 16 ऑगस्टला साजरा होईल.

खरी तारीख आणि वेळ काय?
या वर्षी, अष्टमी तिथी 15 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी समाप्त होईल. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्योदयाची तिथी ग्राह्य धरली जाते, तेव्हा उपवास 16 ऑगस्ट रोजी ठेवला जाईल. त्यामुळे, कृष्ण जन्माष्टमीचा मुख्य उत्सव आणि उपवास 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाईल.
धार्मिकदृष्टीने जन्माष्टमीचा इतिहास काय आहे?
धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा पृथ्वीवर अन्याय, पाप आणि अधर्माचे प्रमाण वाढले होते, तेव्हा भगवान विष्णूंनी कृष्ण म्हणून आठवा अवतार घेतला. त्यांचा जन्म मथुरा येथील कारागृहात माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी झाला होता. कृष्णानेच पुढे कंसाचा वध करून अधर्माचा नाश केला.
कृष्ण जन्माष्ठमी पूजा विधी (Krishna Janmashtami 2025)
- या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात.
- बाळ गोपाळांना लोणी, साखर आणि तुळशीचे पान अर्पण केले जाते.
- महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
- श्रीकृष्णाच्या जीवनावरील विविध लीलांच्या झाक्या आणि रासलीलांचे आयोजन केले जाते.
- या दिवशी आरती केल्याने घरात सुख-शांती नांदते. तुम्ही "आरती कुंज बिहारी की" हे भजन गाऊन कृष्णाची आरती करू शकता.
भगवान श्रीकृष्णाची आरती
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
गले में बैजंती माला,
बजावै मुरली मधुर बाला ।
श्रवण में कुण्डल झलकाला,
नंद के आनंद नंदलाला ।
गगन सम अंग कांति काली,
राधिका चमक रही आली ।
लतन में ठाढ़े बनमाली
भ्रमर सी अलक,
कस्तूरी तिलक,
चंद्र सी झलक,
ललित छवि श्यामा प्यारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
कनकमय मोर मुकुट बिलसै,
देवता दरसन को तरसैं ।
गगन सों सुमन रासि बरसै ।
बजे मुरचंग,
मधुर मिरदंग,
ग्वालिन संग,
अतुल रति गोप कुमारी की,
श्री गिरिधर कृष्णमुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
जहां ते प्रकट भई गंगा,
सकल मन हारिणि श्री गंगा ।
स्मरन ते होत मोह भंगा
बसी शिव सीस,
जटा के बीच,
हरै अघ कीच,
चरन छवि श्रीबनवारी की,
श्री गिरिधर कृष्णमुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
चमकती उज्ज्वल तट रेनू,
बज रही वृंदावन बेनू ।
चहुं दिसि गोपि ग्वाल धेनू
हंसत मृदु मंद,
चांदनी चंद,
कटत भव फंद,
टेर सुन दीन दुखारी की,
श्री गिरिधर कृष्णमुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
आरती कुंजबिहारी की,
श्री गिरिधर कृष्ण मुरारी की ॥
(टिप - ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या मान्यतेवर आधारित आहे. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा माहितीची खात्री करण्यासाठी जाणकार पंडित किंवा ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणे उचित राहील.)












Click it and Unblock the Notifications