Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kiss Day Special: किस करण्याचे हे 5 फायदे माहित आहे का? केवळ प्रेमच नाही 'या' गोष्टीवरही होता परिणाम

Health Benefits of Kissing : 'किस' करणे ही केवळ प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत नसून, विज्ञानाच्या दृष्टीने त्याचे आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. एका गोड स्पर्शाने तुमचं नातं तर घट्ट होतंच, पण तुमच्या आरोग्यालाही मोठे फायदे मिळतात. या किस डे निमित्त जाणून घेऊया 'किस'मागचं विज्ञान आणि या दिवसाचा आनंद द्विगुणित करणारी काही खास गाणी.

Health benefits of kissing  Kiss Day 2026

१. किस करण्याचे ५ आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

स्ट्रेस आणि चिंता कमी होते: किस करताना शरीरात 'ऑक्सिटोसिन' आणि 'डोपामाइन' सारखे आनंदी संप्रेरकं स्रवतात. यामुळे मानसिक ताण आणि चिंता झटक्यात कमी होते.

२. हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

किस करताना हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. हे रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

३. कॅलरीज जळतात

एका अभ्यासानुसार, एका मिनिटाच्या किसिंगमुळे साधारणपणे २ ते ६ कॅलरीज जळू शकतात. हे तुमच्या मेटाबॉलिझमसाठी चांगले असते.

४. रोगप्रतिकारशक्ती वाढते

लाळेच्या देवाणघेवाणीमुळे शरीरात नवीन बॅक्टेरियांचा परिचय होतो, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) नैसर्गिकरित्या सुधारते.

५. चेहऱ्याचा व्यायाम

किस करताना चेहऱ्याचे सुमारे ३० हून अधिक स्नायू सक्रिय होतात. यामुळे रक्ताभिसरण वाढून चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा तरुण राहते.

'किस डे' स्पेशल: टॉप ५ रोमँटिक गाणी

  • जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत हा दिवस अधिक खास बनवायचा असेल, तर काही खास गाणी तुमचा मूड नक्कीच रोमँटिक करतील.
  • केसरिया (ब्रह्मास्त्र): अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं प्रेमाचा एक वेगळाच अनुभव देतं.
  • तुम ही हो (आशिकी २): रोमँटिक गाण्यांच्या यादीत हे गाणं आजही अव्वल आहे.
  • बन जा तू मेरी रानी (तुम्हारी सुलू): एक हलकंफुलकं आणि गोड गाणं.
  • लगी छूटे ना (अ जेंटलमॅन): या गाण्यातील म्युझिक आणि बोल किस डे साठी परफेक्ट आहेत.
  • ओ साथी (बागी २): जोडीदाराबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे एक अतिशय सुंदर गाणं आहे.
  • छु ले ने दो नाजूक ओठो को, कुछ और नही ये जाम है.. हे जुनं गीत खूपच समर्पक आहे त्यातून फक्त नितळ प्रेम जास्त उलगडतं.

हेही वाचा : Kiss Day : कपाळावर किस म्हणजे केवळ प्रेम नव्हे! जाणून घ्या चुंबनाचे प्रकार आणि त्याचा भावनिक अर्थ

हेही वाचा : Kiss Day 2026 : 'किस डे'निमित्त तुमच्या जोडीदाराला पाठवा 'हे' 20 रोमँटिक संदेश; नातं होईल अधिक घट्ट

(Disclaimer): ही माहिती सामान्य आरोग्यविषयक अभ्यासावर आधारित आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही गंभीर तक्रारीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+