Exit Poll For Haryana, Jammu Kashmir : हरियाणात काँग्रेस विजयाची नांदी, काश्मीरमध्ये त्रिशंकू!
J&K and Haryana Exit Poll Result 2024 : हरियाणामध्ये एका टप्प्यात आणि जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान झालेले आहे. विशेष बाब म्हणजे हरियाणात आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान आहे, त्यानंतरच एक्झिट पोल येण्यास सुरुवात होत आहे. निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहे. एक्झिट पोलबाबत जाणून घेण्यासाठी सातत्याने अपडेट करत रहा...!

जम्मू-काश्मीरमधील आधीचे निकाल काय होते?
जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी 2014मध्ये निवडणुका झाल्या होत्या. 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2014 पर्यंत पाच टप्प्यात या निवडणुका पर पडल्या होत्या. 87 विधानसभा मतदारसंघ असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला 28 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 25 जागा तर नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जम्मू काश्मीर पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. तर जम्मू काश्मीर पिपल्स कॉन्फन्सला दोन जागा मिळाल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष निवडून आले होते.














Click it and Unblock the Notifications