Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एक्झिट पोलचे आकडे जाहीर : हरियाणात काँग्रेसला बंपर लॉटरी, भाजपला या कारणांमुळे होणार नुकसान

Jammu Kashmir Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले असून बहुतेक सर्वच एजन्सीजनी काँग्रेसला बंपर लॉटरी लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या निवडणुकीत भाजपचा सपशेल पराभव झाल्याचा अंदाज सर्वच एजन्सी व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलन, महिला सन्मान, कुस्तीगिरांचे आंदोलन हे मुद्दे काँग्रेसला लाभदायक ठरले असून याच मुद्द्यावर भाजप चितपट झाल्याचा झाल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

दैनिक भास्करच्या अंदाजानुसार हरियाणामध्ये भाजपला 15 ते 29 जागा, काँग्रेसला 44 ते 54 जागा, जेजेपी ला शून्य ते एक जागा आणि अन्य उमेदवार पाच ते पंधरा ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे. भास्करच्या अंदाजानुसार काँग्रेस पूर्ण बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.

Haryana Assembly Election 2024

मॅट्रिज या एजन्सीने भाजपला 18 ते 24 जागी विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मॅट्रिकच्या अंदाजानुसार काँग्रेसला बंपर लॉटरी लागली असून 55 ते 62 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. जेजेपी शून्य ते तीन ठिकाणी निवडून येण्याची शक्यता असून 5 ते 11 जागावर अन्य उमेदवार विजयी होतील असे मॅट्रिजचे म्हणणे आहे.

पल्स पल्स या एजन्सीने भाजप 20 ते 32 जागी विजयी होईल असा अंदाज वर्तवला आहे. या एजन्सीच्या अंदाजानुसार काँग्रेस निर्णायक बहुमत घेण्याची शक्यता असून काँग्रेसला 49 ते 61 जागी विजय मिळण्याची शक्यता पीपल्स पल्स व्यक्त करीत आहे. अन्याय एजन्सी प्रमाणे पीपल्स पल्स देखील जे जे पी ला शून्य ते एक ठिकाणी विजयाचा अंदाज वर्तवित आहे. 5 ते 8 ठिकाणी अन्य उमेदवार विजयी होतील असे पीपल्स पल्स चे म्हणणे आहे.

ध्रुव रिसर्च च्या अंदाजानुसार भाजपला 18 ते 24 जागी यश मिळण्याची शक्यता आहे, काँग्रेस 55 ते 62 जागा जिंकेल तर जे जे पी ला शून्य ते तीन ठिकाणी यश मिळेल आणि 5 ते 11 जागी अपक्ष उमेदवार निवडून येतील असे ध्रुव रिसर्च च्या एक्झिट पोल च्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे

जाट समाजाची अस्मिता, साक्षी मलिक विनेश फोगाट बजरंग पुनिया या कुस्तीगीरांनी दिल्लीत केलेले आंदोलन तसेच अलीकडे झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन या मुद्याभोवती हरियाणाची निवडणूक फिरत होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणात रान पेटवले त्यांना त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी सक्षम साथ दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची एकाधिकारशाही तसेच ठराविक भांडवलदारांना भाजपकडून मिळत असलेले झुकते माप यावर राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान भर दिला होता.

कुस्तीगिरांच्या आंदोलनाने हरियाणाच्या निवडणुकीला वेगळे वळण दिले. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे उत्तर प्रदेश मधील नेते ब्रिज भूषण सिंग यांनी महिला कुस्तीगीरांची गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला होता. त्यांना अटक करावी अशी मागणी करीत साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आंदोलन केले होते. विनेश फुगाट यांना तर काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पॅरिस ऑलिंपिक मध्ये आपल्या विरोधात कट रचण्यात आल्याचा दावा विनेश फोगाट यांनी केला. अंतिम फेरीत पोहोचूनही वजन अवघे 100 ग्रॅम ने वाढल्यामुळे विनेश यांना पदापासून वंचित राहावे लागले होते. त्यावेळी भाजपच्या एकाही नेत्याने आपल्याला फोन केला नाही असा दावा विनेश यांनी केला होता. योगेश्वर दत्त आणि बबीता फोगाट यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

हरियाणाचे हे निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी देखील महत्त्वाचे ठरतील असा अंदाज आहे हरियाणा स्पष्ट बहुमत मिळाल्यास काँग्रेसचा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा महाराष्ट्रात मिळाले असून पक्षाचे राज्यातील नेते लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे सुखावले आहेत. हरियाणातील बंपर लॉटरी हा राज्यातील काँग्रेस नेत्यांसाठी बूस्टर डोस ठरण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+