Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Exit Poll Jammu Kashmir : जम्मू काश्मीर त्रिशंकू होण्याचा अंदाज, पीडीपी ठरू शकते गेमचेंजर

जम्मू कश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या मतदानाचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले असून, राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा मिळण्याचा काही एजन्सीजचा अंदाज असून, भारतीय जनता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. पीडीपी काहीसे पिछाडीवर असल्याचे एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत. मात्र तरीही पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती या किंगमेकर च्या भूमिकेत असतील असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Jammu Kashmir Assembly Election 2024

दैनिक भास्करने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला 20 ते 25 जागी यश मिळेल असा अंदाज वर्तवला आहे, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ला 35 ते 40 ठिकाणी यश मिळेल, पीडीपीचे चार ते सात आमदार निवडून येतील आणि 12 ते 16 ठिकाणी अन्य उमेदवार निवडून येतील असे दैनिक भास्करचे अंदाज सांगतात.

आज तक सी वोटर्स च्या एक्झिट पोल नुसार भाजपाला 27 ते 32 ठिकाणी यश मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स 40 ते 48 ठिकाणी जिंकून येईल तर पीडीपीला 6 ते 12 जागा मिळतील आणि सहा ते अकरा ठिकाणी अन्य उमेदवार निवडून येतील असे आज तक सी वोटर्स चे अंदाज आहेत.

मॅट्रीजच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे 28 ते 30 आमदार निवडून येत आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ला सुद्धा 28 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पीडीपी पाच ते सात ठिकाणी जिंकत असून अन्य उमेदवार आठ ते 16 ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे.

पीपल्स पल्स या संस्थेने ही आपल्या अंदाज व्यक्त केले असून भाजप 23 ते 27 ठिकाणी जिंकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या एजन्सीच्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला बहुमत मिळत असून त्यांना 46 ते 50 जागा मिळतील तर पीडीपी सात ते अकरा ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे अन्य उमेदवार चार ते सहा ठिकाणी निवडून येतील असे पीपल्स पल्स चे अंदाज सांगतात.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू कश्मीर मध्ये झालेली ही पहिली विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू कश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे आणि त्यासाठी भाजप जबाबदार आहे असा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. जम्मू भागात भाजपला चांगले यश मिळेल तर काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यात चुरस होईल असा अंदाज होता. मात्र काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स मोठी आघाडी घेताना दिसत आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचाराची धुरा स्वतःकडे घेतली होती. तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरची वाताहत केली असा दावा मोदी शहा यांनी आपल्या प्रचारादरम्यान केला. त्यांचा रोख नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल्ला कुटुंबीय, काँग्रेसचे गांधी कुटुंबीय आणि पीडीपीच्या सईद कुटुंबाकडे होता. जम्मू-काश्मीरमध्ये , स्थिरता आणली, विकासाचे वारे वाहू लागले, दहशतवादी कारवाया कमी झाल्यामुळे पर्यटकांचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे साहजिकच राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावले असा दावा भाजपने केला होता.

काँग्रेसकडून प्रियांका गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे हे प्रचारात आघाडीवर होते. भाजपने जम्मू काश्मीर राज्यातील स्थानिकांचे हक्क डावले आहेत. राज्याचे निर्णय बाहेरची मंडळी घेत आहेत. स्थानिकांचे हित केंद्र सरकारकडून नजरेआड केले जात आहे आणि ठराविक उद्योगपतींचा हितासाठी केंद्र सरकार काम करीत आहे असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या प्रचाराच्या दरम्यान केला होता. सोशल मीडियातूनही काँग्रेसने आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली होती.

एक्झिट पोलचे आकडे बघतात राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे दिसून येत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत देखील जम्मू-काश्मीरमध्ये अशीच परिस्थिती होती आणि त्यादरम्यान पीडीपी आणि भाजपने युती करून सरकार स्थापन केले. दरम्यान सरकार स्थापनेच्या काही वर्षानंतर भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्रातील भाजप प्रणित सरकारने घेतला. या निर्णयाच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी ने राज्यात रान उठवले होते. यावेळी त्रिशांकू विधानसभा अस्तित्वात आल्यास नवी समीकरणे जुळून येण्याची शक्यता आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+