CBSE 12th Board Result : सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर! यंदा 12 वीचा निकाल 88.39 टक्के
CBSE 12th Board results announced : सीबीएसई बोर्ड अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE 2025 Result) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 88.39 टक्के लागला आहे. तसेच सीबीएसईने आजच दहावीचाही निकाल जाहीर केला आहे तर महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही दहावी परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
सीबीएसई बोर्ड अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाना cbse.gov.in आणि results.cbse.nic.in येथे पाहता येणार आहे.

मागच्या वर्षीपेक्षा यंदा 0.41 टक्के निकाल घटला
यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये सीबीएसई बोर्ड बारावी परिक्षेचा निकाल यंदा 88.39 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी हाच निकाल 88.80 टक्के लागला होता. यंदा या परिक्षेच्या निकालात 0.41 टक्क्यानी घट दिसून आली.
हेही वाचा : CBSE 10th Result 2025 : सीबीएससी दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर! 93.66 टक्के विद्यार्थी पास
17 लाख 88 हजार जणांनी दिली परिक्षा
सीबीएसई बोर्ड बारावीच्या परिक्षेला 17 लाख 88 हजार परिक्षार्थी बसले होते. CBSC 12 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज 13 मार्च 2025 निकाल जारी झाले आहेत.
कुठे पाहता येईल निकाल?
- cbse.gov.in
- Result.cbse.nic.in
- cbse.nic.in
- cbseresults.nic.in
- digilocker.gov.in
- या वेबसाइट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता.
CBSE 12 वी बोर्ड परिक्षेचा निकाल कसा तपासायचा?
1. सीबीएसई बोर्ड परिक्षेचा निकाल तुम्हाला जर पाहायचा असेल तर सर्वात आधी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा वर दिलेल्या वेबसाईट्सवर
भेट द्यावी.
2. त्यानंतर "निकाल" किंवा इंग्रजीत Result विभागात जा आणि येथे "बारावी निकाल (12 th Result) 2025" लिंकवर क्लिक करा आणि बघा.
3. आता, तुमचा रोल नंबर, शाळेचा क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन यासारखे तपशील प्रविष्ट करा.
4. यानंतर तुमचा सीबीएसई बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल. असाच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही निकाल दिसेल.
5. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
जर तुम्हाला 10 वीचा निकालही तपासायचा असेल तर अशा विद्यार्थ्याना किंवा त्यांच्या पालकांना याच वेबसाईटवर भेट देऊन निकाल पाहता येईल. त्यांनी फक्त 10th Result या ऑप्शनवर जायचे आहे.
हेही वाचा : मोठी बातमी : आता CBSC 10 वी परिक्षेचा निकाल SMS वरही मिळणार? जाणून घ्या निकाल कसा तपासायचा?
हेही वाचा : CBSE Topper List 2025 : सीबीएसई टॉपर लिस्ट जाहीर का करत नाही? हे आहे खास कारण












Click it and Unblock the Notifications