मोठी बातमी : आता CBSC 10 वी परिक्षेचा निकाल SMS वरही मिळणार? जाणून घ्या निकाल कसा तपासायचा?
CBSC 10th Exam Result : मार्च 2025 मध्ये सुरुवात झालेली सीबीएसई दहावीची परीक्षा संपली, त्यानंतर मे महिन्यात या परिक्षेचा निकाल लागणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल खूपच महत्वपूर्ण ठरतो. कारण यावर पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित करता येतो, यासह भविष्यातील दिशांचा हा पाया असतो.
सीबीएसई बोर्डाचा अशातच दहावीचा निकाल कधी लागेल याची वाट विद्यार्थी पाहत आहेत. निकालाची तारीख मे महिन्यात असेल आणि ती लवकरच बोर्ड जाहीर करेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता एक अपडेट आली असून सीबीएसई परिक्षेचा निकाल एसएमएसद्वारे तुम्हाला तपासता येणार आहे. जाणून घेऊ काय आहे ही प्रक्रीया...

निकालासाठी SMS ची सेवा का दिली जाते?
सीबीएससी बोर्ड परिक्षेचा निकाल ज्यावेळी लागतो त्यावेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी वेबसाईटचा वापर करतात, पण अशावेळी वेबसाईटवर हेवी ट्राफीक असते, त्यामुळे वेबसाईटवर लोड येऊन ती संथ होण्याची किंवा हँग होण्याची शक्यता असते त्यामुळे एसएमएसचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी सोईचा ठरु शकतो.
SMS वर कसा मिळू शकतो CBSC दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल
दहावीचे विद्यार्थी एसएमएस सेवेचा वापर करून निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना 7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवता येईल. यासाठी सीबीएससी 10 वी आसन क्रमांक, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर CBSE इयत्ता 10 वी परीक्षेचे गुण 2025 त्याच नंबरवर टेक्स्ट मेसेज म्हणून पाठवला जाईल.
हेही वाचा : 10 वी, 12 वीचा लवकरच निकाल लागणार! रिझल्ट कुठे पाहायचा; कसा तपासायचा? सर्व माहिती एका क्लिकवर तपासा
'या' वेबसाइट्सवर निकाल पाहता येणार
cbse.gov.in
cbse.nic.in
cbse.nic.in
cbseresults.nic.in
digilocker.gov.in
हेही वाचा : CBSE Board Result 2025 : डिजीलॉकरवर दहावी, बारावीचा निकाल कसा तपासणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
CBSE BOARD 2025 - 10 वी परिक्षेचा निकाल कसा पाहायचा?
- CBSE इयत्ता 10वीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ही आहे यावर लाॅग न करा.
- यानंतर होमपेजवरील निकाल सेक्शनवर क्लिक करा.
- यानंतर, माध्यमिक शाळा परीक्षा (दहावी) लिंक सक्रिय झालेली दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा हजेरी क्रमांक, शाळा क्रमांक किंवा प्रवेशपत्र आयडी प्रविष्ट करा.
- हे केल्यानंतर CBSE बोर्ड 10वीचा निकाल स्क्रीनवर उघडेल.
- आता CBSE 10वीचा निकाल तपासल्यानंतर, जर तुम्हाला हवी असेल तर प्रिंटआउट घ्या.
- प्रिंट आऊट घेणे महत्वाचे आहे कारण या निकालाचा संदर्भ भविष्यातील प्रवेशासाठी कामा येईल.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications