10 वी, 12 वीचा लवकरच निकाल लागणार! रिझल्ट कुठे पाहायचा; कसा तपासायचा? सर्व माहिती एका क्लिकवर तपासा
MSBSHSE 10th and 12th results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकालाची अपेक्षा राज्यातील विद्यार्थ्याना आहे. यंदा या परिक्षेचा निकाल वेळत लागण्याची चिन्हे आहेत, कारण तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या दोन्ही परिक्षांचे निकाल लवकर वेळत आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय लागावेत यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे लवकरच निकाल लागतील अशी आशा आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झाली होती. या परीक्षा 17 मार्च 2025 रोजी संपल्या. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तर यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर परीक्षार्थी होते. 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर परीक्षा पार पडली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यापैकी 8 लाख 10 हजार 348 विद्यार्थी (मुले) आणि 6 लाख 94 हजार 652 विद्यार्थी (मुली) तसेच 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी होते. आता या सर्व विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार याचीच प्रतिक्षा आहे.
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीचे निकालाबाबत नुकतेच माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी बोर्डाच्या वेबसाइटची क्षमता वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेबसाईटवर प्रचंड ट्रॅफिक असते, त्यामुळे वेबसाईट हँग होणे, संथ चालने आदी प्रकार घडतात अशा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचणी येतात, त्यामुळे या समस्या ऐन निकालाच्या दिवशी येऊ नयेत, म्हणून तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिले आहेत.
मे महिन्यात लागतो निकाल
साधारणतः इयत्ता 12वीचा निकाल साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. उदाहरणार्थ, 2024 मध्ये 12वीचा निकाल 21 मे रोजी आणि 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला आहे, त्यामुळे मे महिन्यात बारावी आणि दहावीचा निकाल लागू शकतो.
निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in, sscresult.mkcl.org, hsc.mahresult.in या संकेतस्थळांवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
निकाल ऑनलाईन कसा तपासायचा?
- सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी
- वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावरील 'Maharashtra SSC/HSC Result 2025 या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल, जो तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.












Click it and Unblock the Notifications