CBSE Topper List 2025 : सीबीएसई टॉपर लिस्ट जाहीर का करत नाही? हे आहे खास कारण
CBSE Topper List 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वी परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 13 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. मात्र बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु सीबीएसई मेरिट लिस्ट का जाहीर करत नाही? याबद्दल बोर्डाने त्यामागचं कारण सांगितले आहे.
सीबीएसई टॉपर लिस्ट जाहीर का करत नाही?
बोर्डाचं म्हणणे आहे की, मुलांमध्ये चुकीची स्पर्धा टाळण्यासाठी मंडळ कोणतीही मेरिट लिस्ट जाहीर करत नाही. याशिवाय, सीबीएसई बोर्डाच्या निकालांमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी देण्याची प्रथा देखील रद्द करण्यात आली आहे.

बोर्डाने म्हटले आहे की 'सीबीएसई त्यांच्या 0.1% विद्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट देईल.' विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मेरिट सर्टिफिकेट दिले जाईल. जर तुम्ही त्या 0.1 टक्के मुलांपैकी असाल तर तुम्हाला तुमचे सीबीएसई मेरिट सर्टिफिकेट तुमच्या सीबीएसई डिजीलॉकर खात्यात मिळेल.
दरम्यान काही वर्षांपूर्वीपर्यंत इतर सर्व बोर्डांप्रमाणेच सीबीएसई बोर्डाची टॉपर यादी प्रसिद्ध केली जात असे. त्यानंतर सीबीएसईने सीजीपीए पॅटर्न लागू केला आणि त्या आधारावर 10 सीजीपीए असलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली. परंतु गेल्या 4 वर्षांपासून सीबीएसईने सीबीएसई बोर्डाच्या टॉपर्सची कोणत्याही प्रकारची यादी जाहीर करणे बंद केले आहे.
निकाल कसा चेक करायचा
सीबीएसई ऑनलाइन माध्यमातून निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर होताच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर थेट लिंक ऍक्टीव केली जाईल. यानंतर विद्यार्थी ऍक्टीव लिंकवर क्लिक करून आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करून निकाल तपासू शकतील. वेबसाइटवरून निकाल तपासण्यासाठी खालील खालील स्टेप फॉलो करा.
- सीबीएसईचा 2025 चा दहावीचा निकाल जाहीर होताच, विद्यार्थ्यांना प्रथम अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला निकालाच्या ऍक्टीव लिंकवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला नवीन पेजवर तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल.
- यानंतर तुमची मार्कशीट स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकाल.












Click it and Unblock the Notifications