CBSE 10th Result 2025 : सीबीएससी दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर! 93.66 टक्के विद्यार्थी पास
CBSE 10th Result 2025 : सीबीएसई बोर्ड अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC 2025 Result) दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील लाखो विद्यार्थी आणि पालक या निकालाची वाट पाहत होते.
राज्यात जवळपास 21 लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.66 टक्के इतकी आहे. म्हणजेच जवळपास 20 लाखांच्या आसास विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

कसा आणि कुठे पाहायचा? सीबीएसई बोर्डाचा निकाल (how to check CBSC 2025 Board result)
- cbse.gov.in
- Result.cbse.nic.in
- cbse.nic.in
- cbseresults.nic.in
- digilocker.gov.in
या वेबसाइट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता.
असा पाहा तुमचा निकाल
1. सर्वात आधी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
2.आता "निकाल" किंवा इंग्रजीत Result विभागात जा आणि येथे "दहावी निकाल (10 th Result) 2025" लिंकवर क्लिक करा.
3.12 th चे विद्यार्थीही याच वेबसाईटवर भेट देऊन निकाल पाहू शकतात. त्यांनी फक्त 12th Result या ऑप्शनवर जायचे आहे.
4. आता, तुमचा रोल नंबर, शाळेचा क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन यासारखे तपशील प्रविष्ट करा.
5. यानंतर तुमचा सीबीएसई दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल. असाच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही निकाल दिसेल. निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
किती आहेत परिक्षार्थी?
- CBSC दहावी बोर्ड परिक्षेसाठी यंदा 24 लाख 12 हजार परिक्षार्थी बसले होते. तर बारावीच्या परिक्षेला 17 लाख 88 हजार परिक्षार्थी बसले होते.
- जवळपास 44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या आहेत.
- CBSC 10 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाल्या CBSC 12 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications