पोटाच्या कॅन्सरची 'ही' 5 लक्षणं चुकूनही दुर्लक्ष करू नका; गॅसेस समजून अंगावर काढणं पडू शकतं महागात
Stomach cancer early symptoms signs to watch out : कर्करोग हा एक असा जीवघेणा आजार आहे जो शरीरात कधी शिरकाव करतो, हे समजणे कठीण असते. यातच 'पोटाचा कर्करोग' (Stomach Cancer) ज्याला वैद्यकीय भाषेत 'गॅस्ट्रिक कॅन्सर' म्हणतात, याचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक कर्करोग संशोधन संस्थेच्या मते, जगात सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये पोटाचा कर्करोग पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, याची सुरुवातीची लक्षणे ही इतकी साधी आणि सामान्य असतात की, लोक त्याला अपचन किंवा गॅस समजून दुर्लक्षित करतात. मात्र, हीच चूक जीवावर बेतू शकते.

सावध राहा! 'ही' आहेत पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
१. सतत पोटाच्या वरच्या भागात दुखणे
पोटाच्या वरच्या भागात सतत जडपणा जाणवणे किंवा अस्पष्ट वेदना होणे हे कर्करोगाचे प्राथमिक लक्षण असू शकते. जर हे दुखणे औषध घेऊनही थांबत नसेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. अचानक वजन कमी होणे
कोणताही व्यायाम किंवा डाएटिंग न करता जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल, तर हे शरीरातील गंभीर बदलाचे संकेत आहेत. कर्करोगाच्या पेशी शरीरातील ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे वजन घटते.
३. भूक मंदावणे
पोटाचा कॅन्सर झाल्यास रुग्णाची अन्नावरील वासना उडते. थोडेसे खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते किंवा ढेकर येतात. या लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका.
४. मळमळ आणि उलट्या
पचनक्रियेत बिघाड झाल्यामुळे रुग्णाला वारंवार मळमळल्यासारखे वाटते. काही रुग्णांना अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे उलट्यांचा त्रासही सुरू होतो.
५. छातीत जळजळ आणि गॅस
बहुतेक लोक छातीत जळजळ (Heartburn) आणि गॅसकडे साधी ॲसिडिटी म्हणून पाहतात. मात्र, पोटातील गाठ किंवा असामान्य पेशींच्या वाढीमुळे पचन मंदावते, परिणामी ब्लोटिंग आणि गॅसची समस्या कायमस्वरूपी निर्माण होते.डिस्क्लेमर: या लेखातील माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी किंवा शंकांचे निरसन करण्यासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा : सावधान! कॅन्सरची 'ही' 10 लक्षणे कधीच टाळू नका!; कर्करोग झाल्याचे समजायला उशीर का होतो? जाणून घ्या
हेही वाचा : Cancer Prevention कॅन्सर होऊ नये म्हणून 'ही' काळजी घ्या; किचनमध्ये आणि सवयींमध्ये करा 'हे' छोटे बदल!
हेही वाचा : पुरुषांनो दुर्लक्ष नको! तुम्हालाही होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर! लक्षणे, कारणे अन् पूर्ण उपचार जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications